माफ करा..पण आम्ही घरात बसून काम करू शकत नाही-राज्यमंत्री डॉ. पवार

Nndurbar Political News: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांची जनआशीर्वाद नंदुरबारमध्ये दाखल झाली.
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti Pawar
Updated on


नंदुरबार : लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचे कोविड (Covid-19)नियमांचे पालन करून आम्ही जनआशीर्वाद यात्रा करत आहोत. मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray) महोदय मला माफ करा, आम्ही घरात बसून काम करू शकत नाही. त्यामुळे जनतेत जात आहोत, असा टोला केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार (Minister of State Dr. Bharti Pawar) यांनी मुख्‍यमंत्री यांना लगावला.

Dr. Bharti Pawar
सातबाऱ्यावरील कालबाह्य "बोझ्यांच"ओझं उतरणार



केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवारी (ता. १८) रात्री नंदुरबारमध्ये दाखल झाली. गुरुवारी सकाळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील आढावा घेतला. त्यानंतर दुपारी दीडला विजयपर्व येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्‍थित होते.


भारती पवार म्‍हणाल्या, की कोरोनाच्‍या अनुषंगाने आतापर्यंत देशात ५६.६४ कोटी लोकांना लसीकरण झाले. यात सर्वाधिक लशींचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत; परंतु महाराष्‍ट्र राज्यात एक लाख डोस वाया गेल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजनअभावी किती रुग्णांचा मृत्यू झाला; याबाबत केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहून १३ ऑगस्टपर्यंत आकडेवारी देण्यास सांगितले होते; परंतु राज्याकडून केंद्राला अद्यापही माहिती मिळालेली नाही. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याची गरज आहे. ईशान्येकडील राज्यांनी याची कडक अंमलबजावणी करत कोरोना आटोक्यात आणला.

Dr. Bharti Pawar
धुळ्यात शिवसेना उपप्रमुखाच्या गावातील पदाधिकारींचा भाजपात प्रवेश


रात्री उशिरा जनआशीर्वाद यात्रेचे आगमन
डॉ. भारती पवार यांचे बुधवारी (ता. १८) रात्री नऊनंतर नंदुरबार शहरात आगमन झाले. साक्री नाका येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जल्लोषात त्‍यांचे स्वागत केले. या वेळी खासदार डॉ. हीना गावित, भाजप प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, दीपक पाटील, आमदार राजेश पाडवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पारंपरिक आदिवासी नृत्य करीत जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत केले. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सजविलेल्या गाडीने जनआशीर्वाद यात्रा शहरातून काढण्यात आली.

Dr. Bharti Pawar
पाण्याचे येणारे संकट ओळखून एकवटले शेतकरी; नदीपात्रात नांगरटी सुरू


जिल्‍हा शासकीय रुग्णालयाला भेट
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविडविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडके, डॉ. राजेश वसावे, डॉ. के. डी. सातपुते, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. लसीकरण करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोविड चाचण्या सुरू ठेवून बाधित व्यक्ती आढळल्यास त्याला अलगीकरणात ठेवावे, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.