नंदुरबार : जिल्ह्यात सद्यस्थितीत प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे कोरोना (corona) रुग्ण संख्या (patient) नियंत्रणात आली आहे. मात्र भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (Collector Dr. Rajendra Bharud) यांच्या दुरदृष्टीतून प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात (district hospital) २० हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन टॅँक (Oxygen tank) बसविण्यात आले आहेत. सद्यस्थितीमध्ये २०० ऑक्सिजन बेडस्पर्यंत क्षमता असणारे रुग्णालय आता टॅँकमुळे ३५० बेडस्ला ऑक्सिजन सप्लाय नियमितपणे होवू शकणार आहे. यामुळे जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (nandurbar district hospital twenty thousand liter capacity oxygen tank)
नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनातर्फे योग्य नियोजन करण्यात आल्याने ऑक्सिजनची फारशी कमतरता भासली नाही. जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या एका प्रकल्पामधून १२५ जम्बो सिलेंडर इतका ऑक्सिजन निर्मिती होते. असे जिल्हा रुग्णालयात दोन तर शहाद्यात एक असे तिघा प्रकल्पातून ३७५ जम्बो ऑक्सिजन निर्मिती होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मागणीच्या सुमारे ४० ते ५० टक्के ऑक्सिजन निर्मिती जिल्ह्यातून होत होती. तर उर्वरित गरज ही धुळे, औरंगाबाद, गुजरात व मध्यप्रदेशातून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करुन भागवली जात होती.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
मात्र आगामी काळामध्ये कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. काल अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या दुरदृष्टीतून प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन टॅँक बसविण्यात आले आहेत. सद्यस्थितीमध्ये २०० ऑक्सिजन बेडस्पर्यंत क्षमता असणारे रुग्णालय आता टॅँकमुळे ३५० बेडस्ला ऑक्सिजन सप्लाय नियमितपणे होवू शकणार आहे. जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत २०० ऑक्सिजन बेड आहेत.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे आणखी १५० बेडस् वाढविण्यात आले आहेत. एकूण ३५० बेडस् जिल्हा रुग्णालयातच तयार झाले असून आगामी काळात रुग्ण संख्या वाढल्यास अनेक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणे शक्य नसणाऱ्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दुरदृष्टीतून साकारलेल्या लिक्विड ऑक्सिजन प्लान्टची उभारणी केल्याने जनसामान्यातून समाधान व्यक्त करण्यात येत.
(nandurbar district hospital twenty thousand liter capacity oxygen tank)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.