नंदुरबार जिल्ह्यात मातृवंदना योजनेंतर्गत ३३ हजार महिलांना लाभ

Prime Minister Matruvandana scheme
Prime Minister Matruvandana scheme
Updated on



नंदुरबार : जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत (Prime Minister Matruvandana scheme) आतापर्यंत ३३ हजार ६२० पात्र महिलांना लाभ दिला असून, १३ कोटी ४२ लाख इतके अनुदान डीबीटी पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केले आहे. नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी १ ते ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान मातृवंदना सप्ताह साजरा होत आहे.

Prime Minister Matruvandana scheme
धुळ्याचा महापौर ओबीसीच;सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागल्यास अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांच्या व नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य चांगले राहावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात सुरू केली आहे.

Prime Minister Matruvandana scheme
कळंबबारी घाटात सागवान लाकडाची तस्करी रोखली

तीन टप्यांमध्ये मिळतो लाभ

या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१७ किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल, अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी मिळतो.पहिला टप्पा एक हजार रुपये असून, मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो. यासाठी गर्भधारणा नोंदणी शासकीय आरोग्य संस्थेत करणे आवश्यक असते. दुसरा टप्पा दोन हजार रुपये असून, गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजीपासून बाळाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी मातृवंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून, या सप्ताहात नवीन लाभार्थी नोंदणी, आधार शिबिर, बँक खाते शिबिर घेण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.