कुपोषित बालकांवर उपचारासाठी खडकी येथे बालोपचार केंद्र

कुपोषित बालकांवर उपचारासाठी खडकी येथे बालोपचार केंद्र
divisional-commissioner-radhakrushan-game
divisional-commissioner-radhakrushan-game
Updated on

नंदुरबार : खडकी परिसरातील अतितीव्र कुपोषित बालकांवर स्थानिक स्तरावरच उपचार करण्यासाठी नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत बालोपचार केंद्र सुरू करण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. (nandurbar-divisional-commissioner-radhakrushan-game-visit-and-Pediatric-Center-treatment-of-malnourished-children)

divisional-commissioner-radhakrushan-game
राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या चक्काजाम

धडगाव तालुक्यातील खडकी येथे प्राथमिक केंद्र भेटीच्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण बावा, तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, गटविकास अधिकारी सी. टी. गोसावी आदी उपस्थित होते.

प्रकृतीची काळजी घेता येणार

श्री. गमे म्हणाले, की अंगणवाडी केंद्रात पौष्टिक आहार देऊनही अतितीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बालोपचार केंद्र उपयुक्त ठरेल. तोरणमाळ येथील केंद्रात बालकासोबत पालक थांबण्यास तयार नसल्याने स्थानिक स्तरावर उपचार करणे सोयीचे ठरेल आणि बालकांच्या प्रकृतीचीही चांगली काळजी घेतली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार उपचारात बदल करता येईल. आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात त्रुटी असल्याने त्रयस्थ यंत्रणेमार्फत बांधकामाची चौकशी करण्यात यावी. बांधकामात आवश्यक दुरुस्ती करून आरोग्य केंद्रातील कामकाज लवकर सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

divisional-commissioner-radhakrushan-game
धुळ्यात उपमहापौरांची सोमवारी निवड

अंगणवाडी जि.प. शाळेत स्‍थलांतरीत

खडकी परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कालांतराने तोरणमाळ येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल होणार असल्याने परिसरातील खासगी निवासातील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत स्थलांतरीत करण्याबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी दिल्या. श्री. गमे यांनी झापी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस भेट दिली. तेथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. परमानंद रावळे दुर्गम भागात सेवा देत असल्याने त्यांचे कौतुकही केले.

तोरणमाळ स्कूलच्या इमारतीची पाहणी

विभागीय आयुक्त गमे यांनी तोरणमाळ येथील नवनिर्मित इंटरनॅशनल स्कूल इमारतीची पाहणी करत आवश्यक त्या सुविधांची माहिती घेतली. शाळेच्या परिसरात स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत आणि परिसरातील एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. शाळेच्या परिसरात श्री. गमे यांच्या हस्ते एनएसई फाउंडेशन आणि सीवायडीए संस्थेतर्फे कुपोषण कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या दोन हजार किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.