नंदुरबार : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या निक(Deputy Chief Minister Ajit Pawar) टवर्तीयांवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) धाडसत्र सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपुर येथील आयान मल्ट्रीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर (Ian Multitrade LLP Sugar Factories) ही धाड टाकली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारखान्यात तपासणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या निकटवर्तीयांवर आज राज्यभरात आयकर विभागाकडून धाड सत्र सुरू आहे. त्यात काही सहकारी साखर कारखान्याचा समावेश असून नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील सचिन शिंगारे यांची आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आज सकाळी आयकर विभागाने धाड टाकून तपासणी सुरू केली. कोणाला आतमध्ये जाण्यास परवानगी दिली जात नाही आहे. या कारखान्याची बाराशे मेट्रीक टन प्रति दिवस गाळप क्षमता असून या कारखान्याची मालमत्ता १५० हुन अधिक कोटींची असतांना फक्त ४७ कोटीत हा कारखाना विक्री केल्याचे आरोप केले जात आहे.
शिंगारे हे पवारांचे निकटवर्तीय
साखर कारखान्याचे मालक सचिन शिंगारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे जवळचे आहे. १५० कोटी रुपयांची मालमत्ता कारखान्याची असल्याचे बोलले जात आहे. हा साखर कारखाना १९९६मध्ये सुरू झाला असून आधी पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना म्हणून त्याचे नाव होते. २०१४- १५ मध्ये अवसायानात गेल्याने कारखान्याची विक्री अँस्टोरीया शुगर या नावाने झाली. नंतर तीन वर्षांपुर्वी हे नाव बदलुन आयान शुगर इंडस्ट्रीज करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.