नंदुरबार जिल्ह्यात सिनेमा-नाट्यगृहासह धार्मिक स्थळे बंदच

Nandurbar lockdown : कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण असलेल्या खासगी व औद्योगिक आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा असेल.
नंदुरबार जिल्ह्यात सिनेमा-नाट्यगृहासह धार्मिक स्थळे बंदच
Updated on

नंदुरबार: शासनाच्या मार्गदर्शक (Corona Restrictive rules) तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील उपहारगृह, दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योगसेंटर, सलून, इनडोअर स्पोटर्स व आस्थापना सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी दिले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात सिनेमा-नाट्यगृहासह धार्मिक स्थळे बंदच
शिरपूर बोराडीजवळील जंगलात गांजा पार्टीचा अड्डा उध्वस्त


खुली किंवा बंदिस्त उपहारगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास मूभा दिली आहे. परंतू उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात किंवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृहात आस्थापनांनी लावणे आवश्यक असेल. उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह व बारमध्ये काम करुन शकतील. यासर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

दुकाने, शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत
सर्व व्यापारी दुकाने, शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. वातानुकीत तसेच विना वातानूकूलीत जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योगसेंटर, सलून-स्पा, केशकर्तनालय, ब्युटीपार्लर्स हे ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील. दुकाने, शॉपिंग मॉल्स, इनडोअर स्पोर्ट्स या ठिकाणी खेळाडू, तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. याठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळासाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत खेळण्यास मुभा असेल. सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व नगरपालिका कर्मचारी व व्यस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण असलेल्या खासगी व औद्योगिक आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा असेल.

नंदुरबार जिल्ह्यात सिनेमा-नाट्यगृहासह धार्मिक स्थळे बंदच
पुनर्रचित हवामानाच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत मिळावी-खासदार पाटील

कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन
सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. घरून काम करणे शक्य असलेल्या सर्व आस्थापनांच्या व्यवस्थपनांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा द्यावी. कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल, अशाप्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करावे. खासगी कार्यालयांना वेळेच्या व्यवस्थापनासाठी कार्यालय २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल, मात्र सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

आरटीपीसीआर चाचणी
सर्व सिनेमा हॉल, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स (स्वतंत्र किंवा मॉल्समधील) सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील. आंतरराज्य प्रवासासाठी ज्या नागरिकाचे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील.वाढदिवस, संमेलन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, निवडणूका प्रचार सभा, रॅली, मिरवणूका, मोर्चे अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध असेल. केंद्र शासन, राज्य शासनाने कोविड-१९ च्या योग्य वर्तणूकनुसार दिलेल्या चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार साबणाने धुणे, सॅनिटाईज करणे या मार्गदर्शक सूचनांचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.

नंदुरबार जिल्ह्यात सिनेमा-नाट्यगृहासह धार्मिक स्थळे बंदच
बीएचआर प्रकरणःझंवर नेटवर्किंगमध्ये रिक्षाचालकही भरायचा ई-निविदा


मंगल कार्यालयांनी अशी घ्यावी काळजी
खुल्या प्रांगणातील, लॉन किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल, या अटीवर मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील. विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग व गरजेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल,
कार्यालयांवर दंडनीय कारवाई करण्यात येऊन संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येईल. मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, छायाचित्रकार अशा विवाह व्यवस्थेशी संबंधितांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस झालेले असावे. त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()