तब्बल..३५ वर्ष आणि ते ही पुरुष सेवक चालवीत आहे अंगणवाडी

सातपुडा पर्वतरागांमध्ये वसलेल्या या भागात कसेबसे पोचता येते.
Anganwadi
AnganwadiAnganwadi
Updated on

चिचपाडा ः अंगणवाडी (Anganwadi) नाव तोंडावर आले, तर पटकन चित्र उभे राहते ते अंगणवाडीसेविका अन्‌ त्यांच्या महिला मदतनिसांचे. बालकांना (Children) सांभाळण्यापासून, पोषण आहारवाटप, स्तनदा माता, किशोरी मुलींचा सांभाळ करणे हे सारे काम अंगणवाडीसेविकांचे; (Anganwadi workers) पण हेच काम पुरुष करीत असेल तर विश्वास नाही बसणार नाही; पण हे सत्य आहे. तब्बल ३५ वर्षांपासून अंगणवाडीसेवक म्हणून मांडवा (ता. अक्कलकुवा) येथे करणसिंग वळवी काम करीत आहेत.

(male servant for thirty five years managing anganwadi)

Anganwadi
धुळे महापालिकेतील ओबीसी महापौर आरक्षण रद्द निर्णयाला स्थगिती

आदिवासी (Tribal) बहुल जिल्ह्यातील अतिदुर्गम, नर्मदा काठालगतच्या मांडवा गावात अंगणवाडीसेविका नव्हे, तर चक्क करणसिंग पोहल्या वळवी (वय ४८) अंगणवाडीसेवक म्हणून कार्यरत आहेत. सातपुडा (Satpuda) पर्वतरागांमध्ये वसलेल्या या भागात कसेबसे पोचता येते. त्यामुळेच ३५ वर्षांपूर्वी शासकीय यंत्रणेतील काही लोक या भागात अंगणवाडी चालविण्यासाठी माणसांचा शोध घेत होते. त्यावेळेस नदीवर पोहायला गेलेले करणसिंग वळवी त्यांना भेटले. त्यावेळची चौथी पास आणि लिहिता-वाचता येत असल्याने श्री. वळवी यांच्याकडेच अंगणवाडी चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून करणसिंग वळवी अंगणवाडीसेवक आहेत.


मांडवा अंगणवाडी अंतर्गत
एक ते सहा वयोगटांतील ८१ बालके, दहा गरोदर माता, १४ स्तनदा माता आणि ५९ किशोरी मुली आहेत. आज गावातील स्त्रिया, लहान बालके आणि किशोरी मुली या करणसिंग दादांकडे आवर्जून बैठकीस येतात. शासनाचा पोषण आहारासोबतच अनेक योजनांची माहिती करणसिंग वळवी त्यांना देतात.

Anganwadi
'क्लस्टर’मधून जळगावच्या केळीला वगळले

पत्नी, मुलींची साथ
खऱ्या अर्थाने स्त्रियांशी निगडित असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करायचे आणि त्यात करणसिंग पुरुष असल्यांमुळे स्त्रियांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी संवाद कसा करणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशावेळी त्यांच्या अर्धांगिनी आणि त्यांच्या मुली त्यांच्यासोबत राहिल्या. अनेक प्रश्नांवर महिला, किशोरींसोबत चर्चा करून त्यावर समाधान मिळाले. अंगणवाडी त्यांच्‍या घरीच भरते. मुळातच अंगणवाडीअंतर्गत येणारे सारेच लाभार्थी याच अतिदुर्गम भागात राहणारे. त्यामुळेच स्थानिक भाषेतून शासन उपक्रमासोबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात करणसिंग वळवी यांना अडचण आली नाही.

जिल्ह्यात चार पुरुष सेवक
विशेष म्हणजे करणसिंग यांच्याप्रमाणे तब्बल ११ जण जिल्ह्यात कधीकाळी अंगणवाडीसेवक म्हणून भरती झाले होते. आज त्यांच्यासह फक्त चार पुरुष जिल्ह्यात अंगणवाडीसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यातही करणसिंग पुरुषांमध्ये सीनिअरच. राज्यभर अंगणवाडीचा गाडा महिला अंगणवाडीसेविकांमार्फत हाकलला जात असताना नंदुरबारच्या जांगठी, केवडी, सांबर आणि मांडवा या अतिदुर्गम भागातील अंगणवाडीचा कारभार तब्बल ३५ वर्षांपासून पुरुष सेवकांकडून चालविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.