कर्ज काढू,पण शेतकऱ्यांना मदत करू- अब्दुल सत्तार

कोपर्ली, कोळदा व भालेर येथील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभा घेतल्या.
Minister Abdul Sattar
Minister Abdul Sattar
Updated on


नंदुरबार ः वेळ पडल्यास शासन कर्ज काढेल, पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) मदत करणार, शासनाच्या (Government) नियमानुसारच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Minister Abdul Sattar)यांनी गुरुवारी कोपर्ली येथे बोलतांना दिली.

Minister Abdul Sattar
एमपीएससीत एका मार्काने आले अपयश..तरुणाने उचले टोकाचे पाऊल


शिवसेनेचे नंदुरबार संपर्कमंत्री व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार गुरुवारी नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. त्यांनी कोपर्ली, कोळदा व भालेर येथील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभा घेतल्या. कोपर्ली गटातील राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी उपस्थितांना संबोधित करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे मतदारांना आवाहन केले.


दरम्यान, गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट मदत मिळावी, याविषयी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले, की शासनाच्या नियमानुसारच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी तसे आदेश दिले असून, गरज पडल्यास शासन कर्ज काढून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. पुढील चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. एकट्या मराठवाड्यात वीस लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज असून, महसूल राज्यमंत्री यानिमित्ताने मदत लवकर कशी देता येईल, याकडे लक्ष देऊन असल्याचे त्यांनी सांगितले.

Minister Abdul Sattar
बुडणाऱ्या शेतकऱ्याचे दोघांनी थरारक पद्धतीने वाचविले प्राण

ईडीची नोटीस म्हणजे एनसी गुन्ह्याप्रमाणे

दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांना ‘ईडी’च्या नोटिशीबद्दल विचारले असता त्यांनी ईडीची नोटीस म्हणजे पोलिस ठाण्यामधील एनसीच्या गुन्ह्याप्रमाणे झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ईडीचा दुरुपयोग करू नये, अशी विनंती केली आहे. या वेळी शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, किरण पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.