नंदुरबार ः शिवसेनेचा (Shiv sena) पदाधिकारी ,कार्यकर्तेविषयी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जिल्ह्याच्या मंत्रींनी तक्रार केली असती तर बरे वाटले असते. मात्र उलट चित्र आहे. शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हयाचा मंत्रीविषयी तक्रार करीत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाईलने वागले तर कोणी अडविणार नाही. असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज येथे केले.
( mp sanjay raut instructions shiv sena office bearers and workers)
शिवसेनेचे नेते खासदार ऱाऊत यांच्या उपस्थितीत येथील हॉटेल हिरा एक्झिकेटिव्ह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), संपर्क प्रमुख बबनराव थोरात(Contact Head Babanrao Thorat), माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख डॉ विक्रांत मोरे,आमशा पाडवी, आमदार मंजुळा गावित, विद्या साळी आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांचा समस्या, प्रश्न जाणून घेत प्रत्येकास मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्यापुढे समस्या व पालकमंत्री ॲंड के.सी. पाडवी यांच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचला. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी हे आघाडी शासनातले मंत्री आहेत. तरीही येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामे होऊ देत नाहीत. पदाधिकाऱ्यांना विरोधकासारखे विरोध करतात. शासकिय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना सेनेचा माणसांचे कामे करू देत नाहीत. सहकार्य करीत नाहीत. नेहमी संघर्ष करतात. जिल्हा परिषद निवडणुकीतनंत सभापती निवडीत भाजपच्या गटाला सभापतीपद दिले. शब्द पाळला नाही. असे एक ना अनेक विषयांवर तक्रारी करण्यात आल्या.
शिवसेना कोणीही संपवू शकत नाही !
त्यानंतर मार्गदर्शन करतांना श्री. राऊत म्हणाले की, मंत्री पाडवी यांनी असे वागणे योग्य नाही. शिवसेना -कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतील मंत्री आहेत. आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना न्याय दिला पाहिजे. याविषयी मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवसेनाही सत्तेत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी असे वागले पाहिजे तर तुमची तक्रार मंत्री पाडवी यांनी केली पाहिजे होती. तेव्हा मलाही बरे वाटले असते. माझे शिवसैनिक काम करी आहेत. मात्र तुम्ही मंत्रींची तक्रार करीत आहेत. शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. आतापयंत किती तरी आले व स्वतः संपले, मात्र बाळासाहेबांची शिवसेना जोमाने उभी राहिली. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनावर लक्ष द्यावे, तळागळातील जनतेचे कामे करा. पदाधिकाऱ्यांची कामे होत नसतील तर शिवसेना स्टाईलने वागा, कोणी अडविणार नाही. असे आवाहन करीत संयम ठेवा, निश्चितच तोडगा निघेल, असा सल्ला दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.