निर्यातदार कंपन्यांना रेमडेसिव्हिर वितरणास मान्यता

राज्यात दोन तीन दिवसांतच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारही निर्यात धोरणात बदल करणार आहे.
Remedicivir injection
Remedicivir injectionRemedicivir injection
Updated on

नंदुरबार ः रेमडेसिव्हिर उत्पादक सात कंपन्यांना केवळ निर्यात करण्याचीच परवानगी होती. मात्र, त्या कंपन्यांना स्थानिक स्तरावरही ते विकता येऊ शकते. त्यासाठी गुजरात पॅटर्नची पुष्टी जोडून माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू तथा उद्योजक डॉ. रवींद्र चौधरी यांनी राज्य व केंद्र शासनास संकल्पना पटवून दिली. त्या संकल्पनेचा राज्य व केंद्र शासनानेही सकारात्मक विचार केला आहे. निर्यातदार कंपन्यांना आता महाराष्ट्रातही रेमिडेसिव्हिर वितरण करण्यात मान्यता देत येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोनाने झपाटलेल्या व मृत्यूच्या दाढेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

Remedicivir injection
नंदूरबार जिल्ह्यातील २८ हजार शिधापत्रिकाधारकांना लाभ

येथील हिरा ग्रुपचे डॉ. रवींद्र चौधरी व माजी आमदार शिरीष चौधरी या बंधूंची संकल्पना शासनाने मान्य केली आहे. राज्यात दोन- तीन दिवसांतच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारही निर्यात धोरणात बदल करणार आहे. केवळ नंदुरबारच नव्हे, तर महाराष्ट्रभर कोरोना रुग्णांसाठी ते मिळावेत, म्हणून प्रयत्न केले आहेत. त्यासाठी तीन दिवसांपासून चौधरी बंधू मुंबईत बसून प्रयत्न करीत आहेत.

रेमडिसिव्हिरचा पुरवठा करण्याची परवानगी

उत्पादक कंपन्यांना स्थानिक वितरणास परवानगी नसल्याने तो साठा पडून आहे व इतर ज्या सात कंपन्यांना देशांतर्गत वितरणास परवानगी आहे. त्यांच्यावर ताण पडत आहे. याबाबत येथील उद्योगपती डॉ. रवींद्र चौधरी व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आपत्कालीन परिस्थितीत निर्यातबंदी असलेला माल वितरित करता येतो. हवे तर ५० लाख इंजेक्शन आम्ही उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही दिली होती. या संकल्पनेची दखल घेतली असून, निर्यातबंदी असलेला रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे.

Remedicivir injection
कोरोनाचा विळखा ः धुळे जिल्ह्याला गरज ३२ टन ऑक्सिजनची

राज्य सरकारकडून हालचालींना वेग

गुजरात सरकारने ज्या प्रकारे निर्यातीच्या मालाला परवानगी दिली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही परवानगी द्यावी, जेणेकरून रेमडेसिव्हिरचा तुटवडा भरून निघेल. ज्या पुरवठादार कंपन्या आहेत, त्यांच्याकडे माल आहे. त्यापेक्षाही जास्तीच्या इंजेक्शनची सध्या मागणी आहे. त्यामुळे ज्या निर्यातबंदी घातलेल्या सात कंपन्यांनी देशात विक्रीस परवानगीची मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने हालचालींना वेग दिला आहे. शासनाने राज्यात वितरणास परवानगी दिली आहे.

Remedicivir injection
सापळा रचला आणि रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्याला पकडले

आमची ही योजना राज्य व केंद्र सरकारने स्वीकारल्याने महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे, याचा आनंद आहे. मात्र, शासनाने आता त्याबाबतची अंमलबजावणी लवकर करावी.

-डॉ. रवींद्र चौधरी, उद्योगपती, नंदुरबार

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.