तळोदा : रात्री-अपरात्री वडिलांना कूपनलिकेच्या (Borewell) वीज पुरवठा (Power supply) सुरू करण्यासाठी सहा किलोमीटर अंतरावरील शेतात जावे लागत असल्याचे पाहून तळोद्यातील योग पंजराळे या १५ वर्षीय विद्यार्थ्याने घरूनच कूपनलिकेच्या वीज पुरवठा सुरू व बंद (Power supply on and off) करण्याचे डिवाइस (Device) तयार केले आहे. त्यामुळे विज व पाण्यासोबत वेळेचीही बचत होत आहे. त्यात शेतकऱ्याला घरूनच वीजपुरवठा सुरू करणे शक्य होत असल्याने रात्री शेतात (Farm) जाणे कमी झाल्याने शेतकऱ्याला सुरक्षितता मिळाली आहे. त्यामुळे या अनोख्या शोधामुळे पंचक्रोशीत योग पंजराळे याचे कौतुक करण्यात येत आहे.
( nandurbar taloda city child created a device to turn the power supply on and off)
येथील डॉ. सूर्यकांत पंजराळे यांच्या आपला वैद्यकीय व्यवसायासोबत शेतीच्या देखील व्यवसाय आहे. शेतीसाठी वीज पुरवठा कधी दिवसा तर कधी रात्री होत असल्याने रात्रपाळीच्या वेळी सूर्यकांत पंजराळे यांना शेतात कूपनलिकेच्या वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जावे लागत होते. रात्री-अपरात्री शेतात गेल्याने सर्प, विंचू, बिबट्या यांची भीती होतीच. त्यात तळोदा शिवारात बिबट्याची दहशत पसरली होती. त्यामुळे योग पंजराळे व कुटुंबियांना ते घरी परत येईपर्यंत चिंता लागलेली असायची.
या सर्व परिस्थितीचा विचार करून योग पंजराळे याने कोरोना लॉकडाउन काळात शिकून घेतलेल्या कोडींग एप्लीकेशन वर वडिलांना मदत करणारे डिवाइस बनवता येऊ शकेल काय याची चाचपणी केली. त्यासाठी सुमारे चार हजार रुपयाचे रॉ मटेरियल व इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी केले. ते साहित्य वापरून एक डिवाइस तयार केले. ते डिवाइस कूपनलिकेच्या स्विच ला जोडले. त्यातून कूपनलिका सुरु व बंद करण्यासाठी फार्मर हेल्पर नावाचे ॲप विकसित केले.
या डिव्हाईस व फार्मर हेल्पर अँपचा माध्यमातून कूपनलिकेचे स्विच बंद अथवा सुरू करता येऊ लागले. त्यामुळे योगच्या आनंदाला आकाश ठेंगणे झाले. त्यात या अँप व डिव्हाईस मुळे वडिलांना रात्री शेतात जावे लागत नसल्याने कुटूंबियांसोबत योगला देखील समाधान लाभले आहे.दरम्यान या शोधामुळे योगचे कौतुक करण्यात येत आहे.
कूपनलिका सुरू व बंद करण्याचे डिव्हाइस तयार केल्याने अनेक शेतकऱ्यांनी या डिव्हाईसची मागणी योग पंजराळे यांच्याकडे नोंदणी केली आहे. सध्या योग याचप्रकारचे सात ते आठ मागणीचे डिव्हाईस बनवण्यात व्यस्त झाला आहे. त्यामुळे त्याचा या डिव्हाईसला मागणी अजून वाढल्यास त्यात पुढील करिअर करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला. तर आतापर्यंत अनेक अप्लिकेशन योगने तयार केली असल्याचे त्याचे वडील डॉ सूर्यकांत पंजराळे यांनी सांगितले.
माझे वडिलांना रात्री शेतात जातांना पाहून मनात भीती असायची. केवळ कूपनलिका सुरू व बंद करण्यासाठी जावे लागते हे पाहून मला हा त्रास कमी व्हावा असे वाटू लागले. त्यामुळे डिव्हाईस व अँप बनविण्याची कल्पना सुचली व प्रत्यक्षात ते खरे करून दाखवल्याचे समाधान आहे.
योग पंजराळे
डिव्हाईस निर्माता
तळोदा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.