१५ फुट अजगाराचा हल्ला..आणि डोळ्यासमोर शेळी केली फस्त

डोळ्यादेखत आपली शेळी फस्त केली तरी अजगराचा विळख्यातून शेळीला वाचवू शकले नाहीत.
python
pythonpython
Updated on


नंदुरबार : १५ फूट लांब अजगराने (python) जंगलात चरणाऱ्या शेळीवर (Got kill ) झडप घालून शेळीलाच फस्त केल्याची घटना गुरुवारी (ता.२४) सातपुड्यातील तोरणमाळ येथील जंगलात घडली. त्यामुळे पशु मध्ये भितीचे वातावरण आहे. ( toranmal forest python attack kill got)

python
कुपोषित बालकांवर उपचारासाठी खडकी येथे बालोपचार केंद्र

आतापर्यंत जिल्‍ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा फडशा पाडल्याचा घटना बऱ्याचदा घडल्या आहेत. त्यामुळे तळोदा-अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकरी व पशुपालकामध्ये बिबट्यांसह लांडग्यांविषयी भिती कायम आहे. मात्र अजगराने शेळी फस्त केल्याची कदाचित पहिलीच घटना सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या सातपायरी घाटात घडल्यामुळे जिल्हावाशियांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

python
pythonpython

अजगराने झडप घातली
सातपायरी घाटातील रस्त्याजवळ सुरेश नानसिंग चौधरी स्वतःच्या मालकीच्या शेळ्या चारायला गेले होते. यावेळी घाटात शेळ्या चरत असतांना कुरण खाण्यात व्यस्त असलेल्या एका शेळीवर पंधरा फूट लांबींचा अजगराने झडप घातली. काही क्षणा शेळीचा शरीराला भक्कम विळखा मारला. तसेच शेळीचा शरीरावरील मांसाचे लचकेतोडू लागला. यावेळी चौधरी याने रस्त्यावरील शेळी गेली कुठे? असे म्हणत शेळीचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध घेवू लागले. अचानक एका ठिकाणी शेळी जमिनीवर पडलेली दिसली. ती औरडण्याचा प्रयत्न करू लागली मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा आवजही जोरात येईना. शेळीच्या विचित्र आवाजामुळे सुरेश चौधरी यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर चक्क अजगराने शेळीला गुंडाळलेल्या अवस्थेत दिसून आले. सुमारे दीड ते दोन तास अजगराने शेळीवर ताव मारला.

पशुपालक हताश..

डोळ्यादेखत आपली शेळी फस्त केली तरी चौधरी अजगराचा विळख्यातून शेळीला वाचवू शकले नाहीत. हताश होत त्यांनी तत्काळ इतर शेळ्या हाकून घराकडे नेल्या. गावात याबाबत घटनेची माहिती दिली. तोरणमाळ वनक्षेत्र अधिकारींना घटनेची माहती दिली.त्यानी घटनास्थळी जाऊन पाहिले असता शेळीचा मृत्यू झला होता.तरीही अजगर आपला विळखा घालुन शेळीचा मांसाचे लचके तोडत होता.

python
मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल

अजगाराचा हल्ला प्रथम..

आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याच्या घटना घडल्या आहे, परंतु अजगराच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली असून जंगल भागात पाळीव प्राणी चारण्यासाठी जात असताना घाबरून न जाता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आव्हान तोरणमाळ वनक्षेत्रपाल सचिन खुने यांनी केली आहे. सदर शेळीचा पंचनामा करून शेळी पालकाला शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()