पिंपळगाव बसवंत : उन्हाळ कांद्याच्या दरात जोरदार तेजी आली आहे. मागणी वाढल्याने तीन वर्षांनंतर उन्हाळ कांद्याने तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला आहे. गेल्या दोन दिवसांत बाजारभाव सातशे रुपये प्रतिक्विंटलने वधारले आहेत. तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचे आकर्षक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. हे दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, बेंगळुरू येथे मुसळधारेमुळे आलेल्या पुरामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तेथील नवीन कांदा बाजारात येऊ न शकल्याने देश व परदेशातील कांदापुरवठ्याची भिस्त नाशिकवर अवंलबून आहे. दररोज एक लाख टन कांदा नाशिकमधून परराज्य व विविध देशांत पाठविला जात आहे. त्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, उमराणे आदी कांद्याच्या बाजारपेठांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवकेत घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव नवा टप्पा गाठत आहे. दरवाढ होत असल्याने अधिकच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा विक्रीला आणण्याचे थांबविले आहे.
देशांतर्गत बांगलादेश, कोलकता, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार यांसह परदेशात दुबई, कुवेत, कोलंबो येथून मागणी वाढली आहे. पिंपळगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. 27) उन्हाळ कांद्याची 25 हजार क्विंटल आवक होऊन दर किमान एक हजार 501, कमाल दोन हजार 900, तर सरासरी दोन हजार 651 रुपयांपर्यंत मिळाले.
पूरस्थितीमुळे कोल्हापूर, सांगली येथील नवीन कांदा बाजारात आलेला नाही. त्यामुळे सर्व भिस्त नाशिकच्या उन्हाळ कांद्यावर आहे. आवकेत वाढ न झाल्यास दरातील तेजी कायम राहू शकते.
-विजयराज बाफणा, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत
या वर्षी मी डिसेंबर जानेवारीत चार साडेचार एकर कांदा लागवड केला. पाच एकरसाठी मला अडीच ते तीन लाख रूपये खर्च झाला होता,आताचा भाव जो सुरु आहे, तो पुरेसा नाही. सध्या कांदा खराब होत असून माझ्याकडे अडीचसे ते तीनशे कि्वंटल कांदा शिल्लक आहे. सध्याच्या भावापेक्षा मला पस्तीसशे ते चार हजार रूपये भाव हवा तर माझा खर्च निघेल.
विजय जाधव,कळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.