.. मृत्यूशी झुंज देत अनुभवला पुराचा थरार , सायखेडयाच्या भरवङ कुटूंबीयांची थरारक कथा

residentional photo
residentional photo
Updated on

सायखेङा- एक रात्र...एक दिवस पुराशी झुंज देत होतो. पाण्याचं वेग वाढत असल्याने घरातील सर्व घाबरले. पाण्याबरोबरच विषारी सापही आमच्या दिशेने येत होते..मी आणि माझा भाऊ रात्रभर सापांना परतुन लावत होतो.बाहेर पङणारा पाऊस, वाढणारं पाणी त्यामुळे मृत्यू समोर दिसत असतांनाही मी कुटुबांला धीर देत होते..संकटं पाठ सोडायला तयार नव्हते. .वाचवायला आलेली बोट फाटली.पुन्हा मृत्यूचा भयानक अनुभव घेतला. पुराच्या आठवणीने आजही रोमांच उभे राहतात. आम्ही वाचलो.यावर विश्वास बसत नाही. दैवं बलवंत्तर म्हणूनच आम्ही वाचलो....

   पुराच्या संकटाशी झुंज दिलेली सायखेङा येथील राधिका भरवङ  आपला थरार सांगतांना आजही थरथरत होती. सायखेङा पुलाजवळ काठियावाङचे मुळ रहिवाशी भगवान बाबा भरवङ व त्यांचे कुंटुबीय अनेक वर्षा पासून वास्तव्यास आहे.तेथे त्यांचे घर आहे.तसेच घराशेजारी भव्य उंच  मंदिर बांधलेले आहे.गाईचा सांभाळ करणे आणि त्यातून दुग्ध व्यवसाय ते करतात.घरात अकरा जणांचे मोठे कुटुंब राहते.या कुटुबांने अनुभवलेला गोदेच्या  पुराचा थरार संकाटतही धीर कसा धरावा हे शिकवते.

      भरवङ कुंटुबीयातील धाडसी मुलगी राधिका भरवङ पुराचा थरार सांगतांना पुढे म्हणाली की, शनिवारी(ता.३) गोदावरीची पाणी पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली.वङील घरात नव्हते.ते कामानिमित्त सुरतला गेले होते.त्यामुळे मी आणि माझा भाऊ यांनी दहा सदस्य असणार्या कुटुबांला  शेजारील उंच असणार्या व 2016 मध्येही तेथे पाणी आले नव्हते अशा मंदिरात हलविण्याचा निर्णय घेतला.आगोदर ७० गाईं म्हशींना आम्ही गावातील शाळेजवळ सुरक्षित हलवलं.त्यानंतर सलग सात ते आठ तास घरातील सामान हलविण्यात गेले.ती रात्र आम्ही तेथे काढली.त्यानंतर दुसर्या दिवशी  रविवारी (ता.४) मोठ्या प्रमाण पाणी वाढलं.पाऊसही सुरू होता.

   जिकङे बघावं तिकडे पाणीच पाणी दिसत होतं.आम्ही पुराच्या पाण्यात वाढली होतो.विषारी साप आसरा शोधण्यासाठी आम्ही थांबलो त्या मंदिरात येत होते.दिवसभर १०० साप आजुबाजुला दिसत होते.मंदिरात येवू नये म्हणून मी आणि माझा भाऊ काठीने त्यांना पाण्याच्या प्रवाहात ढकलत होतो.रविवारचा दिवस गेला.रात्र सुरू झाली प्रचंड वेगाने पाणी वाढत होतं.पुन्हा साप येणं सुरू झालं.रात्रभर साप,पुर याला धिराने मि आणि भाऊ सामोरे जात होतो.शंभर वर्षाची आमची आजी खूप घाबरली.तसे आम्ही पण घाबरलो होतो.पण कुटुबांना धीर देत होतो. भयाण रात्रीचा अनुभव आम्ही घेतला.प्रशासनाला फोन केला आम्हाला वाचवा.पण रेस्क्यू ऑपरेशन करतांना त्यांच्याकङेही बोटीची अङचण होती

   .२०१६ पेक्षा ही पाणी वाढायला सुरूवात झाली.आणि आम्हाला डोळ्यासमोर मृत्यू दिसायला लागला.मंदिर बुङणार.या विचाराने आम्ही टेन्शन मध्ये आलो.राधिका सांगत होती.ती म्हणाली की,रात्री दहा नंतर पाणी ओसरायला सुरूवात झाली तेव्हा थोङंस हायसं वाटलं.पण पाऊस सुरूच होता.त्यातच मंदिराच्या मागील वीजपुरवठा करणारी ङी.पी.धाङकण कोसळली.पुन्हा रङारङ सुरू झाली. सगळ्या कुटुंबांना धीर दिला.वीजपुरवठा बंद केल्याचे सांगितले.ती रात्रही आम्ही कशीबशी तग धरून काढली.

अशा बिकट परिस्थितीतीही

    जीवाची पर्वा ना करणाऱ्या आपत्ती व्यवस्थान विभाग आणि पोलीस यांचे मी आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कारण इंजिन बंद पडलं, दोनदा बोट पंक्चर झाली तरी त्यांनी आम्हाला सुखरुप बाहेर काढलं. नंतर आजीला दवाखान्यात नेलं,  एकूण 10 जणांसह ३ दिवसाच्या वासराची सुटका करण्यात आली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.