जिल्हा संचार बंदी तरी..लसीकरणासाठी सीमा उल्लंघन !

जिल्ह्या अंतर्गत संचार बंदी नियम लागू असतांना कुठलाही प्रकारचा नियम पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे.
vaccination
vaccinationvaccination
Updated on

वडाळी ः वडाळी (ता. शहादा ) येथील लसीकरण केंद्रावर (vaccination center) कधी नव्हे एवढी गर्दी लसीकरणाला (vaccination) झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा (health workers) एकच गोंधळ उडाला मात्र स्थानिकांनी (Citizen) याबाबत चौकशी केल्यावर धुळे जिल्ह्यातील अनेक लाभार्थी लसीकरणासाठी आले असल्याने एवढी गर्दी झाल्याचे निष्पन्न झाले काही जणांनी विरोध दर्शवला मात्र स्थानिकांची लसीकरणासाठी संख्या कमी असल्याने आलेल्या लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली.

( rules not followed citizens travel another district vaccination)

vaccination
राजकीय वलयातील पिता-पुत्र जोडींच्या ‘एक्झिट’

येथील लसीकरण केंद्रावर 45 ते 60 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाचे काम सुरू आहे त्यात दर दिवशी 50 ते 60 लसीकरण होते. मात्र आज लसीकरणासाठी सकाळपासून मोठी गर्दी वाढू लागली काल-परवा गावात लसीकरणाच्या जागरणसाठी काढण्यात आलेला रॅलीचा चा प्रभाव असल्याकारणाने एवढी गर्दी झाली असल्याची समज आरोग्य कर्मचारी व स्थानिकांना झाले. मात्र वाहनांचा ताफा व त्यातून आलेल्या लाभार्थी त्यातून वाढणारी गर्दीची बिंग फुटले. धुळे जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले यात लसीकरण केंद्र परिसरात स्थानिक व बाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये ताण-तणाव झाले मात्र नागरिकांचे नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने आलेल्या नागरिकांना देखील लसीकरण करण्यात आले.

vaccination
आता खरीप पिकांसाठी शेती मशागतीला सुरुवात !

संचार बंदी तरी सीमा उल्लंघन
राज्यात पंधरा पंधरा दिवसाचे संचार बंदी करण्यात आले यातून जीवनावश्यक वस्तूंसह औषधालय दवाखाने यांना देण्यात आले त्यात जनता कर्फ्यु विकेंड लोकडॉन यामुळे शेती उपयोगी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने यांना वेळेचे बंधन ठेवून मुभा देण्यात आली मात्र या नियमांचे सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्याचबरोबर वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यात कुठलेही प्रकारचे अडवणूक अथवा तपासणी केली जात नसल्याने नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे यामुळे कोरूना चा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने संचार बंदी च्या काळात सर्व आलबेल अशीच चर्चा सर्वत्र होत आहे.

धुळे जिल्ह्यातून काही नागरिक लसीकरणासाठी आले होते आपल्याकडे लसीचा साठा मुबलक असल्याने व स्थानिक नागरिकांचा लसीकरणासाठी अल्प प्रतिसाद असल्याने आलेल्या नागरिकांच्या लसीकरण करण्यात आले नियमानुसार राज्यात लाभार्थ्याला कुठेही लसीकरण करून घेण्यास बंधन नाही मात्र त्यांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.


- डॉ.विजय मोहने, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळी.

( rules not followed citizens travel another district vaccination)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()