धुळे जिल्ह्यात केवळ 22 टक्के पेरणी

जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सर्वात जास्त असून सुर्यफूलाचे क्षेत्र सर्वात कमी आहे.
Farming Work
Farming WorkFarming Work
Updated on



सोनगीर : जिल्ह्यात 'मे'च्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस (Rain) झाल्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गात (Farmer) काळजीचे वातावरण असून पेरण्या खोळंबल्याने पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. जिल्ह्यात खरीपाची केवळ 22.40 टक्के पेरणी (Kharif sowing) झाली आहे. आता पावसाची गरज असून गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता काळजीत वाढ झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यात आतापर्यंत कापसाची (Cotton) लागवड सर्वाधिक म्हणजे 38. 81 टक्के झाली आहे.(twenty two percent sowing was done in dhule district)

Farming Work
Farming WorkFarming Work

अत्यल्प क्षेत्र वगळता धुळे जिल्हा अद्यापही दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो.
जिल्ह्यात 24 जूनपर्यंत. सरासरी 442 मिमी पाऊस झाला. त्यातही धुळे तालुक्यात सर्वाधिक 1052 मिमी व सर्वात कमी 196 मिमी शिंदखेडा तालुक्यात पडला. सुरुवातीला शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई केली. पेरणीनंतर मात्र पावसाने दडी मारल्याने उर्वरित पेरणी रखडली आहे. जिल्हय़ात चार लाख 16 हजार 978 हेक्टर क्षेत्र पेरणीचा लक्ष्यांक असून त्यापैकी 93 हजार 386 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्याप 77. 60 टक्के म्हणजेच तीन लाख 23हजार 592 हेक्टर क्षेत्रात पेरणी लांबली आहे. धुळे तालुक्यात सर्वाधिक 33.80 तर शिरपूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 15.09 टक्के पेरणी झाली आहे.

Farm
FarmFarm


धुळे तालुक्यात एक लाख सात हजार 800 हेक्टर क्षेत्रापैकी 36हजार 433 हेक्टर म्हणजे 33.80 टक्के, साक्री तालुक्यात एक लाख एक हजार 850 हेक्‍टरपैकी 16 हजार 291 हेक्टर म्हणजे 16 टक्के, शिरपूर तालुक्यातील एक लाख सहा हजार 596 हेक्टर पैकी 16 हजार 89 हेक्टर म्हणजे 15. 09 टक्के, आणि शिंदखेडा तालुक्यातील एक लाख 732 हेक्टर पैकी 24 हजार 573 हेक्टर म्हणजे 24.39टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीपात कापूस, बाजरी, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सुर्यफूल, सोयाबीन आदींची उत्पन्न घेतले जाते.

Farming Work
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून आला!

पाऊस न पडल्याने चिंतेत भर

मात्र लवकरच पाऊस न झाल्यास चिंतेत भर पडणार आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सर्वात जास्त असून सुर्यफूलाचे क्षेत्र सर्वात कमी आहे. सुर्यफूलाच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. अद्याप भात, नागली, तीळ, सुर्यफूलची पेरणी झाली नाही.

Farming Work
Farming WorkFarming Work

जिल्ह्यात एकूण पेरणी हेक्टरमध्ये
कापूस - 86928
भात - 00
ज्वारी - 450
बाजरी - 470
मका - 4676
तूर - 560
मूग - 50
उडीद - 20
भुईमूग - 65
तीळ -00
सुर्यफूल - 00
सोयाबीन - 167

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.