बिबट्याने अचानक मारली उडाली..आणि जीवाचा झाला थरथराट!

दररोज अनेक शेतात शेतकऱ्यांना बिबट्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत
Leopard
LeopardLeopard
Updated on

तळोदा ः शिवारात शेतात (farm) रात्री पिकांना पाणी देत असतांना शेतकऱ्यांच्या (farmers) समोर अचानक (Leopard) बिबट्याने उडी मारली आणि शेतकऱ्याचा जीवाचा थरकाप उडाल्याची घटना घडली. आजूबाजुच्या शेतकऱ्यांना देखील बिबट्याचा डरकाळी एकून शेतकऱ्यांनी शेतीतील पंप बंद करून तातडीने घाबरलेल्या अवस्थेत घरी जावे लागले. त्यामुळे तळोदा शिवारात तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (field at night saw leopard farmer frightened )

Leopard
बीएचआर प्रकरण: आमदारांचे आर्थिक व्यवहार रडारवर!

तळोदा शहर व परिसरात असलेल्या शेत शिवारात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान बसवले आहे. दररोज अनेक शेतात शेतकऱ्यांना बिबट्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत. शुक्रवारी रात्री आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या भगवान माळी यांची दोन्ही मुले मुकुंदा कर्णकार व कन्हैया कर्णकार यांच्यासमोरच बिबट्याने बांधावरून उडी घेतली. जिवाचा थरकाप उडवणारी ही घटना डोळ्यासमोरच घडल्याने या तरुण शेतकऱ्यांनी तात्काळ वीज पंपाचा वीज पुरवठा बंद केला व घरी येणे पसंत केले.

Leopard
LeopardLeopard

बाजूचे शेतकरी घाबरले

बाजूच्या शेतातच त्यांचे काका रत्नजीत माळी हे देखील पिकांना पाणी भरत असताना त्यांना देखील बिबट्याची डरकाळी ऐकू आली. त्यामुळे त्यांनीही वीजपुरवठा बंद करून घरी निघाले. त्यामुळे शेत शिवारात बिबट्याचा भीतीने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे देखील अडचणीचे झाले आहे. दुसरीकडे शिवारातील शेतकऱ्यांनी तळोदा वन विभागाला वेळोवेळी कळवून देखील वन विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

Leopard
LeopardLeopard

तळोदा वनविभाग कधी पिंजरा लावणार

मागील नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र वनविभागाने त्या निवेदनाला देखील केराची टोपली दाखवली आहे. दुसरीकडे शेजारील गुजरात राज्यात शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविल्यानंतर निंभोरा शिवारात दोन ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता . त्यात एका पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याने त्याला जेरबंद करता आले होते. मात्र तळोदा वनविभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तळोदा शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.