तळोदा ः दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला (Buddha Pournima) होणारी प्राणी गणना (Wildlife Count) सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे (corona) प्रत्यक्ष मानवी सहभागातून होऊ शकली नसली तरी वनविभागाने वाल्हेरी, ढेकाटी या परिसरात ट्रॅप कॅमेरे (Trap camera) लावून प्राणी गणना व त्यांचा हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅप कॅमेऱ्यात कोणताही प्राणी कैद होऊ शकला नसला तरी वनविभागाच्या पथकाला रात्री वाल्हेरी वनक्षेत्रात मोर (Peacocks) व घुबड (owls) पक्षी दिसून आलेत. त्यामुळे अस्वल (Bear) , बिबट्या (Leopards) या प्राण्यांच्या शोधात गेलेल्या पथकाला केवळ मोरांवर समाधान मानावे लागले आहे. (taloda forest area wildlife count trap camera peacocks)
बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल व प्रखर प्रकाशात वन विभागाकडून (Forest Department Squad) प्राणी गणना करण्याचा प्रघात आहे. रात्री-पानवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे माग काढले जातात. त्यानुसार वन्य प्राण्यांचे अधिवास, त्यांच्या येण्याजाण्याचा मार्ग आदींवर देखरेख ठेवली जाते. तळोदा वनक्षेत्रात (Taloda forest area) बिबट्या, अस्वल, रानमांजर, तडस, कोल्हे, लांडगे, माकड, गिधाड, मोर आदी विविध प्रकारचे प्राणी व पक्षी यापूर्वीही आढळून आले आहेत. त्यांची गणना करून आढावा घेण्याचे काम दरवर्षी केले जाते. यात प्राण्यांच्या पायाचे ठसे, त्यांची विष्ठा, खाल्लेली फळे, केलेली शिकार यावरून आढावा घेण्यात येतो.
दोन वर्षापूर्वी बुद्धपौर्णिमेला प्राणी गणना करत असताना वाल्हेरी वनक्षेत्रात बिबट्यासह अस्वलाचे दर्शन झाले होते. त्यावेळी तळोदा वनक्षेत्रातील प्राणी विविधता दिसून आली होती. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने मानवी सहभागातून होणारी प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे. मात्र येथील वनविभागाने दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून व गस्ती पथकाचा द्वारे प्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजविहिर ढेकाटी ते वाल्हेरी दरम्यान मोराचे दर्शन झाले तर घुबड पक्ष्यांचा आवाज कानी पडत होता अशी माहिती वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांनी दिली. यावेळी वनपाल वासुदेव माळी, वनरक्षक चुनीलाल पाडवी, देवराम पाडवी व वन विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
बिबट्या, अस्वलचा मुक्त संचार
तळोदा वनक्षेत्रात व शेतशिवारात बिबट्या व अस्वल यांचा मुक्तसंचार आहे. दररोज कोणत्या तरी गावाचा हद्दीत बिबट्या दर्शन देत असतो. तळोदा शिवार ते आमलाड, तळवे, मोड, बोरद, चिनोदा, प्रतापपूर परिसरात बिबट्या वाघांचा वावर तर राजविहिर, बेलीपाडा, वाल्हेरी, कोठार, रोझवा, चौगाव, रापापुर परिसरात अस्वल मोठ्याप्रमाणात आढळून येतात.
(taloda forest area wildlife count trap camera peacocks)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.