Market Committee Election Analysis : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील यांचे बेरजेचे राजकारण प्रस्थापित व दिग्गजांना मंथन करायला लावणारे ठरले.
या बेरजेच्या सकारात्मक राजकारणाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल, देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांची सक्रिय साथ मिळाल्याची बाब या निवडणुकीच्या माध्यमातून अधोरेखित झाली.
या बेरजेच्या सकारात्मक राजकारणातून पारंपरिक आणि अनेक वर्षांपासून सत्ताकेंद्र असलेल्यांना मतदारांनी नाकारले. अर्थातच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी केलेले काम यावरून मतदार अभिजित पाटील यांच्यासोबत असल्याचे मतपेटीतून सिद्ध झाले.
भविष्यात या भागात होणाऱ्या विविध निवडणुका आणि त्या माध्यमातून होणारे विकासाचे राजकारण यासाठीदेखील ही साथ परस्परांची कायम राहावी या दृष्टिकोनातून विश्वास महत्त्वाचा ठरेल. (Market Committee Election Analysis Abhijit patil total politics successful shock to established nandurbar news)
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांचा निकाल म्हणजे इतिहास ठरला आहे. प्रस्थापित व दिग्गज नेत्यांविरोधात अभिजित पाटलांनी आपले वडील तथा शहादा पालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,
जयपाल रावल, राजेंद्र गावित व सर्वसामान्य शेतकरी, जनता यांच्या पाठिंब्यावर एकाकी झुंज दिली. त्यात ते यशस्वीही झाले; परंतु आगामी काळात येणाऱ्या तालुक्यातील विविध निवडणुकांमध्ये हे बेरजेचे राजकारण कायम राहिल्यास निश्चितच वेगळे निकाल पाहायला मिळतील.
बाजार समितीची निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नव्हती. लोकांमधून निवडून आलेले, लोकांचे विविध संस्थेत तसेच गाव कारभारी म्हणून अख्खे गाव सांभाळणाऱ्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत मतदान केले. त्यामुळे आपल्यासारख्याच प्रतिनिधीला निवडून देण्यासाठी मतदारांनी चांगलेच सद्सद्विवेकबुद्धीने मतदान केल्याचे निकालावरून दिसून येते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दुरावा झाला दूर
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व माजी कृषी सभापती अभिजित पाटील दोघेही युवा नेते गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकाच दिग्गज नेत्याचा प्रचार करत होते; परंतु प्रचारावेळी कळंबू (ता. शहादा) येथे दोघांपैकी कोण मोठा समर्थक, मीच या दिग्गज नेत्याचा मोठा समर्थक आहे.
या कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. हा विषय जिल्ह्यात चर्चेचा ठरला होता. त्याच कारणावरून दिवसेंदिवस दोघांमध्ये वैरभाव वाढत गेला होता. प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले; परंतु या दिग्गज नेत्यामुळे आपल्यातील वैरभाव वाढला आणि तिसरीच व्यक्ती नेत्याच्या जवळ झाली.
आपल्याला डावलले जात आहे हे हेरून बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वैरत्व विसरत पुन्हा दोघेही युवा नेते एकत्र आल्याने त्याचा फटका प्रस्थापित व दिग्गजांना बसला हे मात्र निश्चित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.