Market Committee Election : 'या' तारखेला मतदान; भाजपविरुद्ध आघाडीत वर्चस्वाची लढत..

Market Committee Election
Market Committee Electionesakal
Updated on

धुळे : धुळ्यासह साक्री, शिंदखेडा व शिरपूर बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कायदेशीर लढाईनंतर ३० एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. (Market Committee Election voting on 28 april dhule news)

त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हा कार्यक्रम जाहीर केला. यात ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या कार्यक्रमानुसार चार दिवसांत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाला या संदर्भात अधिकार देण्यात आल्याने साधारणतः शुक्रवारी (ता. २४) स्थानिक पातळीवर हा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

२७ मार्चला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, २७ मार्च ते ३ एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी, ५ एप्रिलला अर्ज छाननी, ६ एप्रिलला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी ६ ते २० एप्रिल, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना चिन्हवाटप करण्याची तारीख २१ एप्रिल, मतदान २८ एप्रिल, मतदानानंतर तीन दिवसांत मतमोजणी घेण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

धुळे बाजार समितीच्या तत्कालीन सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १८ डिसेंबर २०२० ला संपुष्टात आला होता. धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात मतदानाचा अधिकार असलेल्या १८ पैकी १२ संचालकांनी ९ फेब्रुवारी २०२१ ला जिल्हा उपनिबंधक, पणन महासंचालकांकडे राजीनामे दिले होते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Market Committee Election
Nashik News: तिच्या अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती अन् विवाहाच्या चौथ्यादिवशी तिने घेतला अखेरचा श्वास

त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी राजीनामे दिल्याने सत्तासंघर्ष उफाळून आला होता. उपसभापती रितेश पाटील, संचालक प्रभाकर पाटील, किरण गुलाबराव पाटील, माधवराव पाटील, अशोक पाटील, सुरेखा पाटील, लता पाटील, अर्जुन पाटील, प्रमोद जैन, कीर्तिमंत कौठळकर, भानुदास भिल, सुलोचना शिंदे अशा बारा संचालकांनी राजीनामे दिले होते.

ते काँग्रेस आघाडीचे कट्टर समर्थक आहेत. उर्वरित सहा संचालकांमध्ये सभापती सुभाष देवरे, मनोहर देवरे, विजय गजानन पाटील, गोपीचंद पाटील, विजय चिंचोले, गंगाराम कोळेकर यांनी, तसेच पणन प्रक्रियेतून निवडून आलेले व मतदानाचा अधिकार नसलेले संचालक राजेंद्र भदाणे यांचा समावेश होता. सध्या धुळे बाजार समितीवर प्रशासक मंडळ आहे. तसेच साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुका बाजार समितीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Market Committee Election
Nandurbar News : चालीरीतींना फाटा देत मुलींनी दिला पित्याला मुखाग्नी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.