St Anthony Church lit up in city for Christmas Deopur Church in second photo
St Anthony Church lit up in city for Christmas Deopur Church in second photo esakal

Christmas 2023 : नाताळनिमित्त धुळ्यात बाजारपेठ फुलली; भेटवस्तूंची रेलचेल

प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून सोमवारी (ता. २५) साजरा होणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शहरातील चर्चला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Published on

Christmas 2023 : प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून सोमवारी (ता. २५) साजरा होणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शहरातील चर्चला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

राजवाडे मंडळासमोरील सेंट अॅन्थोनी चर्च, देवपूर चर्च, साक्री रोडवरील मागलाई चर्च आदी ठिकाणी आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट झाली आहे. (market in Dhule blossomed on occasion of Christmas dhule news)

नाताळनिमित्त चर्चमध्ये सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. बालगोपाळांना सांताक्लॉज चॉकलेट वाटप करेल. ख्रिसमससाठी शहरातील मुख्य बाजारपेठ फुलली आहे. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची गर्दी होत आहे.

शहरातील विविध दुकानांमध्ये नाताळ सणासाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल बघायला मिळत आहे. ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र सण ख्रिसमसची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली असल्याचे चित्र आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानांमध्ये वस्तूंचे आकर्षक मांडणी केली आहे.

विविध साहित्य सज्ज

विशेषतः मुलांना आकर्षित करण्याकडे दुकानदारांचा कल आहे. यावर्षी बाजारात विविध प्रकारचे सजावट साहित्य पाहायला मिळत आहे. ख्रिसमस ट्री, स्टार बेल, कपडे, टोप्या, वेगवेगळ्या स्टॅच्यू, गव्हाणी, येशूचे पोस्टर्स, टॅगिंग बेल, रंगीबेरंगी ख्रिसमस बॉल्स, सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटा, कागदी तसेच मेटल स्टार, आकर्षक लायटिंग, फुगे, कंदील, होली रीट, प्रभू येशू आणि मेरीची मूर्ती आदी साहित्य बाजारात उपलब्ध आहेत.

St Anthony Church lit up in city for Christmas Deopur Church in second photo
Christmas Celebration 2023 : शाळेतील ख्रिसमस पार्टीसाठी असं बनवा मुलांना सॅन्ताक्लॉज, होईल कौतुकाचा वर्षाव

गिफ्ट दालन खुले

ख्रिसमसनिमित्त बाजारात गिफ्टचे दालन खुले झाले आहे. स्टार (चांदण्या) ४० ते ४०० रुपये, छोट्या चांदण्या ३५ ते १५०, सांता क्लॉज टोपी २०, ३० ते ७०, घंट्या १० ते १००, ख्रिसमस ट्री ४० ते दोन हजार ५००, सजावटीसाठी लागणारे निरनिराळ्या आकाराचे बॉल्स ३० ते १००, सांता क्लॉज प्रतिमा ४० ते आठ हजार ५००, मेरी ख्रिसमस व हॅपी न्यू इयरचे बॅनर्स वॉल स्टिकर्स ६० ते १५० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

केकसह सेलिब्रेशन

नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून मिठाई, चॉकलेट आणि केकची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने ख्रिसमससाठी खास केक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय शहरातील चर्च, कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नाताळ सणाचे सेलिब्रेशन होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.

सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या खरेदीकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. लाल आणि पांढऱ्या रंगसंगतीच्या सांताक्लॉजच्या पेहरावाला अधिक मागणी आहे. नाताळनिमित्त खास भेट देण्यासाठी ख्रिसमस ट्री सह विविध गोष्टी ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत.

St Anthony Church lit up in city for Christmas Deopur Church in second photo
Christmas 2023 : अंतराळात वाजलेलं पहिलं गाणं होतं 'जिंगल बेल्स', जाणून घ्या ख्रिसमसच्या खास गोष्टी

सोशल मीडियावरही ख्रिसमस

शहरात ख्रिसमस साजरा होणार आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही दोन दिवसांपासून ख्रिसमस साजरा होत आहे. त्यात प्रामुख्याने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर त्यांच्याच टीमकडून यूजर्सना ‘मेरी ख्रिसमस.. हॅपी ख्रिसमस’ केले जात आहे. याचबरोबर दूर राहणाऱ्या मंडळींना फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून मेमरीज पाठवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

''जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस. ख्रिस्ती धर्मियांसह सर्वधर्मीय बंधू-भगिनी नाताळनिमित्त चर्चला भेट देतात. सेंट अ‍ॅन्थोनी चर्चमध्ये रविवारी (ता. २४) रात्री प्रार्थना विधी होईल. तसेच ख्रिसमसच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २५) धार्मिक कार्यक्रम होतील. चॉकलेट, केक वाटपातून नाताळ सण उत्साहात साजरा होईल.''- फादर विल्सन रॉड्रिग्ज,धर्मगुरु, सेंट अ‍ॅन्थोनी चर्च, धुळे

St Anthony Church lit up in city for Christmas Deopur Church in second photo
Christmas 2023 : ख्रिसमसपार्टीची शोभा वाढवतील अशा रांगोळी, १० मिनिटात तयार होईल डिझाईन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()