Nandurbar Crime News: शेतकरी लुटीचा मास्टरमाइंडच कापूस व्यापारी! बंदुकीच्या धाकाने लुटणारे 5 अटकेत

Superintendent of Police P while showing the seized vehicle and cash, pistol from the robbers. R. Patil & Team
Superintendent of Police P while showing the seized vehicle and cash, pistol from the robbers. R. Patil & Teamesakal
Updated on

नंदुरबार : गुजरातमध्ये कापूस विकून आल्यानंतर दुचाकीने भालेर गावाकडे जाताना होळ चौफुलीजवळ बंदुकीचा धाक दाखवून दोघा भावंडाकडून १४ लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच लुटारूंना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, या लूट प्रकरणाचा मास्टरमाइंड हा कापूस व्यापारीच निघाला आहे.

त्यानेच नातेवाइकांच्या मदतीने ही लूट केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी धामणगाव, शिरूड (ता. धुळे) येथून इतर चौघांना अटक करीत कारही ताब्यात घेतली आहे. (mastermind of farmers robbery cotton merchant robbed 5 people at gunpoint 21 lakhs worth of goods seized police raid nandurbar crime news)

भालेर येथील सुनील गंगाराम पाटील व त्यांचा चुलतभाऊ हंसराज दगाजी पाटील हे दोन्ही शेतकरी गुजरातमधील कडी येथून कापूस विकून येत होते. शुक्रवारी (ता. १०) रात्री दीडच्या सुमारास ते नंदुरबार येथे कापूस व्यापाऱ्याच्या आयशर गाडीतून उतरले.

त्यानंतर जगतापवाडी चौफुलीवरून त्यांच्या चुलत बंधूच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. त्या वेळी त्यांच्याकडे कापूस विकून आलेली रोकड होती. भालेर रोडने होळकडे जाणाऱ्या फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीच्या पुढे एक पांढऱ्या रंगाची चारचाकी येऊन थांबली.

तिच्यातून उतरलेल्या चौघांनी कार आडवी लावून दोन्ही भावंडांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून १३ लाख ९४ हजारांची रोकड हिसकावली. त्याला दोघांनीही प्रतिकार केला असता, बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने रोकडची पिशवी हिसकावून घेत तेथून पलायन केले होते.

या घटनेने प्रचंड खळबळ उडली होती. सुनील गंगाराम पाटील (वय ५४) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरविली.

पोलिसांनी सुनील पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, संशयितांकडे अर्धवट नंबर प्लेट (एमएच-०४) असलेली पांढऱ्या रंगाची ती स्वीफ्ट डिझायर गाडी होती, एवढीच त्रोटक माहिती मिळाली होती. पोलिसांनी जिल्ह्यात व सीमेलगत तसेच धुळे जिल्ह्यातील पोलिसांना घटना कळवून नाकेबंदी केली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Superintendent of Police P while showing the seized vehicle and cash, pistol from the robbers. R. Patil & Team
Mumbai Crime News : संतापजनक! १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार

पोलिस अधीक्षक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे सहा वेगवेगळे पथके तयार करून गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना करण्यात आली होती.

इकडे कापूस उत्पादक ज्या गाडीतून कापूस घेऊन गेले होते त्या आणि परत येतानाच्या गाडीचा चालक याची पोलिसांनी तर्काच्या आधारे प्रथम चौकशी सरू केली. एलसीबी पीआय किरणकुमार खेडकर यांनी शेतकरी माल घेऊन

गेलेल्या गाडीचा चालक व सोबत असलेला कापूस व्यापारी उमेश पाटील यांची विचारपूस केली. त्यांनी सुरवातीलाच उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. परंतु सीसीटीव्ही फुटेज व उमेश पाटील सांगत असलेल्या हकिकतमध्ये तफावत आढळून आली.

यावरून उमेश पाटीलवर संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याचा धामणगाव (जि. धुळे) येथील नातेवाईक चैत्राम पाटील व त्याच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती दिली.

Superintendent of Police P while showing the seized vehicle and cash, pistol from the robbers. R. Patil & Team
Satara Crime News: सोने लुटणाऱ्या दोघा बिहारींना अटक

शिरूड, धामणगावहून पकडले

सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांनी इतर संशयितांच्या अटकेसाठी धामणगाव गाठून सर्वांना एकाच वेळी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांचे नाव व गाव विचारले असता चैत्राम ऊर्फ झेंडू राजधर पाटील (वय ४१ ), सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील (२४), दीपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील (२६, तिन्ही रा. धामणगाव, ता. जि. धुळे) असे सांगितले.

चौकशीत त्यांनी गुन्ह्यातील बंदुकीचा धाक दाखवून हिसकावलेले पैसे, बंदूक दीपक ऊर्फ बबलू यांच्या शेतातील झोपडीमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे चौथा साथीदार शिरूड (ता. धुळे) येथील राहुल भोई या तरुणाचे असल्याचे सांगितले. पथकाने झोपडीमधून दुधाच्या कॅनमध्ये लपविलेली १३ लाख २६ हजार ५४० रुपये रोकड व २५ हजार रुपये

किमतीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे हस्तगत केले. शिरुड गावातून राहुल बळिराम भोई (वय २५) यास गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ताब्यात घेण्यात आले. गाडीच्या नोंदणी क्रमांकाबाबत माहिती घेण्यात येत आहे. रोकड १३ लाख २६ हजार ५४० रुपये, २५ हजार रुपये

किमतीचे पिस्तोल, गुन्ह्यात वापरलेले वाहन, पाच मोबाईल असा एकूण २१ लाख दोन हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल नंदुरबार शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Superintendent of Police P while showing the seized vehicle and cash, pistol from the robbers. R. Patil & Team
Pune Crime : धक्कादायक! भर रस्त्यात चुंबन घेतलं अन् म्हणाला लग्न कर नाही तर...तरुणावर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.