पर्यावरणपूरक उत्पादनातून धुळ्याच्या तरुणाची सातासमुद्रापार झेप !

संशोधनातून स्वविकसित उत्पादन जागतिक स्तरावर निर्यात करण्याची खूणगाठ बांधली
पर्यावरणपूरक उत्पादनातून धुळ्याच्या तरुणाची सातासमुद्रापार झेप !
Updated on

धुळे ः वाटचालीचा आर्थिक मार्ग सुकर असतानाही स्वतःचा वेगळा ठसा उमटावा, स्वक्षमता ओळखून तिचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या येथील उद्योजक (Entrepreneur) डॉ. माणिक वाणी या तरुणाने पर्यावरणपूरक (Environmentally friendly) उद्योगाची स्थापना करत पुढे संशोधनालाही (Research) चालना दिली. यातून उद्योजकतेसह पीएच.डी. पदवी प्राप्त करत त्याने सातासमुद्रापार धुळे जिल्ह्याच्या लौकिकाचा झेंडा रोवला आहे. तो इतर होतकरू तरुणांसाठी आदर्शवत ठरला आहे.

(dhule youth success of environmentally friendly production)

पर्यावरणपूरक उत्पादनातून धुळ्याच्या तरुणाची सातासमुद्रापार झेप !
धुळे जिल्ह्यात १२२ गावांनी कोरोनाला थोपविले वेशीबाहेर

माणिकचे वडील राजेश वाणी येथील प्रथितयश उद्योजक आहेत. त्यांचे ब्रॅन्डेड हिमालय वॉटर स्टोअरेज टँकचे उत्पादन आहे. तरीही त्याने आत्मविश्‍वासाच्या बळावर वेगळा मार्ग निवडला. संशोधनातून स्वविकसित उत्पादन जागतिक स्तरावर निर्यात करण्याची खूणगाठ बांधली. त्यात तो अल्पावधीत यशस्वी झाला. माणिकने धुळे शहरालगत एमआयडीसीत इकोफ्रेंडली ॲन्ड बायोडीग्रेडेबल पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड एक्स्पोर्टचा उद्योग स्थापन केला.

पर्यावरणपूरक कप

बाजारात चहा, कॉफीसह विविध उपयोगी यूज ॲन्ड थ्रोचे प्लॅस्टिक कप मिळतात. चहा घेतल्यानंतर बरेच कप हाताला चटका देतात, प्लॅस्टिक नरम झाल्याने कप सांभाळताना कसरत होते. ते लक्षात घेत माणिकने गुणवत्ता, दर्जात्मक कपचे उत्पादन सुरू केले. बऱ्याच कपांना आतील बाजूने प्लॅस्टिकचे आवरण असते. मात्र, माणिकने प्लॅस्टिक वगळून वॉटर बेस कोटिंगचे दोन ते तीन आवरणाचे नावीन्यपूर्ण कप तयार केले आहेत. ते मजबूत आणि डिकम्पोज होतात. त्यामुळे पर्यावरण, मानवी शरीराला घातक ठरत नाहीत. यात त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यातीत झेप घेतली आहे.

पर्यावरणपूरक उत्पादनातून धुळ्याच्या तरुणाची सातासमुद्रापार झेप !
जळगाव जिल्ह्यात बारा लाख वृक्ष लावले जाणार !

पीएच.डी. पदवी प्राप्त

इंडोनेशिया, चीननंतर भारताला या कपनिर्मितीतून त्याने जागतिक मंजुरी मिळविली आहे. चीन वगळून जगात कुठेही माणिकचे उत्पादित पर्यावरणीय कप निर्यात होऊ शकतात. त्यासाठी त्याने दुबई, केनिया, कॅनडा येथे स्वतःचे कार्यालय थाटण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माणिकने संशोधनासह अभिनव उत्पादननिर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर एमबीएला असताना अठराशे केस स्टडी केल्या. १७ ते १८ देशांत भटकंती करत १९४ देशांतील स्थितीचा अभ्यास केला. त्यात कुठल्या उत्पादनांची चांगली विक्री आणि नावीन्यतेला वाव आहे, हे जाणले. हाच अनुभव संशोधनात अवलंबून माणिकने विशेष बाब म्हणून वयाच्या २९ व्या वर्षी न्यू यॉर्क येथील अमेरिकन विद्यापीठातून ३ मेस सस्टनेबल बिझनेस डेव्हलपमेंट या विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त केली. आपल्याकडील ज्ञान आणि स्वयंसिद्धतेची कास समाजाला उपयोगी ठरावी, म्हणून माणिक व्याख्याने, मार्गदर्शनासाठी जातो.

माणिक वाणीची वाटचाल

माणिकने धुळ्यात जयहिंद हायस्कूलमध्ये प्राथमिक, एसएसव्हीपीएसमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा, शिरपूरस्थित आर. सी. पटेल अभियांत्रिकीतून पदवी, नरसी मोंजी विद्यापीठात २०१६ मध्ये एमबीए केले. २०१७ मध्ये धुळे एमआयडीसीमध्ये उद्योग स्थापन केला. त्याची ऊर्मी पाहून वडील राजेश वाणी आणि कुटुंबाने भक्कम साथ दिली. त्याची प्रयोग, कृतिशीलता आणि नावीन्यपूर्णतेची कास पाहून अमेरिकन विद्यापीठाने कमी वयात संशोधनाची संधी दिली. त्याचे चीज त्याने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.