Dhule News : शिंदखेडा येथील भाजी मंडईचा तिढा कायम; बैठकीत ठोस निर्णय नाही

शहरातील भाजी मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजी विक्रेते आणि मुख्याधिकारी यांच्यात एकमत होऊ शकले नाही.
Official Prashant Bidgar guiding the vegetable vendors in the meeting
Official Prashant Bidgar guiding the vegetable vendors in the meetingesakal
Updated on

Dhule News : शहरातील भाजी मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजी विक्रेते आणि मुख्याधिकारी यांच्यात एकमत होऊ शकले नाही. ज्या भाजी विक्रेत्यांना नवीन बांधलेल्या भाजी मंडईत ओटे दिले आहेत.

त्यांनी त्याच ठिकाणी आपला भाजी विक्रीचा व्यवसाय करावा व उर्वरित विक्रेत्यांनी पर्यायी जागा सुचवावी, अशी भूमिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी घेतली. त्या वेळी उर्वरित भाजी व फळविक्रेत्यांनी एकच गोंधळ केला. (meeting held Nagar Panchayat office to resolve issue of vegetable market dhule news)

बसस्थानकाशेजारील शासकीय गुदामाच्या आवारातील जागेचा पर्याय उर्वरित भाजी व फळविक्रेत्यांना सुचविल्यानंतर या जागेस त्यांनी होकार दिला. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाजी बाजार भरल्यास भाजी मंडईचा प्रश्नातील तिढा कायम राहण्याची शक्यता आहे.

येथील भाजी मार्केटचा प्रश्न सुटावा म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६३ लाख रुपयांच्या खर्चातून येथे भाजी व फळ विक्रेत्यांसाठी ओटे व शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या या ओटे व शॉपिंग गाळ्यांचा लिलाव गेल्या जुलै महिन्यात करण्यात आला होता.

या लिलावात ज्यांनी ओटे घेतले त्यांनी २५ जानेवारीपासून भाजी विक्रीसाठी बसावे अशा नोटिसा नगरपंचायतीमार्फत या व्यावसायिकांना देण्यात आल्या होत्या; परंतु उर्वरित व्यावसायिक रस्त्यावर दुतर्फा भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने मंडईकडे कोणताही ग्राहक भाजी खरेदी करण्यासाठी येत नसल्याचे कारण सांगत नवीन बांधलेल्या भाजी मंडईत एकच दिवस भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती.

त्यानंतर पुन्हा भाजी विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा आपला व्यवसाय करू लागले. त्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी बिडगर यांनी सर्व भाजी व फळविक्रेत्यांची येथील नगरपंचायतीच्या सभागृहात उर्वरित व्यावसायिकांना पर्यायी जागा सुचविण्यासाठी मीटिंग बोलवली होती.

Official Prashant Bidgar guiding the vegetable vendors in the meeting
Dhule News : धुळ्यात डे केअर सेंटरला मान्यता; हिमोफिलिया रुग्णांना दिलासा

नवीन भाजी मंडई तयार करताना विक्रेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही. विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार केला गेला नाही. शहरातील भाजी व फळविक्रेत्यांची एकूण संख्या बघता नव्याने बांधण्यात आलेली भाजी मंडई अडचणीची ठरत आहे.

या भाजी मंडईतील ओटेदेखील अतिशय लहान आहेत. ज्या भाजी विक्रेत्यांकडे पैसा होता त्यांनी अधिकची बोली लावून एकापेक्षा जास्त ओटे खरेदी करून घेतले. त्यामुळे अनेक भाजी आणि फळविक्रेते ओटे खरेदी करण्यापासून वंचित राहिले.

शहरातील भाजी आणि फळविक्रेत्यांना एकाच ठिकाणी जागा दिल्यास चांगला व्यवसाय होऊ शकतो. भाजी मंडईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो, अशी कैफियत भाजी आणि फळ विक्रेत्यांनी बैठकीत मांडली.

पर्यायास सहमती

उर्वरित व्यावसायिकांची जोपर्यंत कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या व्यवसायिकांनी आपला व्यवसाय करावा, असे सुचविताच व्यावसायिकांनी या जागेला विरोध केला.

Official Prashant Bidgar guiding the vegetable vendors in the meeting
Dhule News : जिल्ह्यात पर्यवेक्षकांची अदलाबदली; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बदलण्यासाठी गळ

गेल्या तीन वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याच जागेवर व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागला. त्या वेळी उर्वरित भाजी विक्रेत्यांनी बसस्थानकाशेजारील शासकीय गुदामाच्या आवारात भाजी व फळ विक्री करावी, असा पर्याय सुचविण्यात आला. या पर्यायास या विक्रेत्यांनी आपली सहमती दर्शवली आहे.

नगरपंचायतीने उर्वरित भाजी व फळविक्रेत्यांना शासकीय गुदामात आपला व्यवसाय करण्यासाठी जागा दिल्यास शहरात दोन ठिकाणी भाजी विक्री व्यवसाय होईल. त्यामुळे ६३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजी मंडईच्या तिढा मात्र कायमच राहील अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

"शिंदखेडा शहरात बांधण्यात आलेल्या भाजी मंडईत ज्या विक्रेत्यांनी ओटे खरेदी केले आहेत अशा भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू करावीत. सर्व व्यावसायिकांना एकाच ठिकाणी जागा देणे शक्य नाही. भगवा चौक ते शिवाजी चौफुली या रस्त्यावर दुतर्फा व्यवसाय करण्याची कोणतीही परवानगी नाही.

नगरपंचायतीला अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू नये. उर्वरित भाजी आणि फळविक्रेत्यांना सुचविण्यात आलेली पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत स्तरावर सर्व कार्यवाही करण्यात येईल." -प्रशांत बिडगर, मुख्याधिकारी न.प.,‌ शिंदखेडा

Official Prashant Bidgar guiding the vegetable vendors in the meeting
Dhule Municipality News : धुळ्यात 4 दुकाने सील; मनपाच्या जप्ती पथकाची करवसुलीप्रश्‍नी कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.