Dhule Water Scarcity : साक्री तालुक्यात पाणीटंचाईचे ढग; तयारी संभाव्य पाणीटंचाईची

Water scarcity
Water scarcityesakal
Updated on

Dhule Water Scarcity : साक्री तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई संदर्भात सोमवारी (ता.१७) आमदार मंजुळा गावित यांच्या अध्यक्षतेखाली दमंडकेश्व मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईची ढग गडद होऊ नये यासाठी वेळीच नियोजन करण्यात येत आहे. (meeting will be held regarding possible water shortage in Sakri taluka on 17 april dhule news)

बैठकीत आयोजन जि. प., प. स. सदस्य सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष यांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले असून बैठकीस येताना संभाव्य पाणी टंचाईबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती आणावी असेही आमदार मंजुळा गावित यांनी म्हटले आहे.

आमदार मंजुळा गावित साक्री तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई संदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात सोमवारी (ता. १७) साक्री येथे बाल आनंदनगरीच्या सभागृहात सकाळी साडेदहाला तर पिंपळनेर येथे दमंडकेश्व मंगल कार्यालयात दुपारी तीनला आमदार मंजुळा गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Water scarcity
Nashik Crime News : चोरट्यांकडून महिलांच्या दागिन्यांची लुट; अडीच लाखांचे दागिने लंपास

सदर बैठकीस पंचायत समिती सभापती, उपसभापती, साक्री तालुक्यातील जि. प. प. स. सदस्य, साक्री तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष, तलाठी, गट विकास अधिकारी साक्री, तहसीलदार साक्री, अपर तहसीलदार पिंपळनेर, पंचायत समितीचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता उपस्थित राहणार आहे.

या बैठकीत पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाय योजनांबाबत विहीर अधिग्रहण करणे, बोर अधिग्रहण करणे, बंद पडलेले हातपंप दुरुस्त करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, साक्री तालुक्यातील लघु प्रकल्पात आरक्षित केलेले पाणी आदींबाबत चर्चा होणार आहे.

या बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून सरपंच आणि ग्रामसेवक तसेच, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष यांनी आपल्या गावात पाणीटंचाई संदर्भात करावयाच्या उपाय योजनांबाबत आवश्यक असलेली माहिती लेखी स्वरूपात बैठकीस येताना आणावी असे आवाहन आमदार मंजुळा गावित यांनी केले आहे.

Water scarcity
Dhule News : जीपीएस नसल्यास वाहतूक पास बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.