Dhule News : वाइन शॉपप्रकरणी आज मंत्रालयात बैठक : आमदार फारूक शाह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी पुतळ्यामागील विनोद वाइन शॉप तेथून हटविण्यात यावे, या मागणीसाठी आझाद समाज पार्टीतर्फे धुळ्यात आंदोलन सुरू आहे.
MLA Farooq Shah's representative Shehbaz Shah giving the invitation letter to the hunger striker Anand Londhe for the meeting held in the Ministry regarding the wine shop issue.
MLA Farooq Shah's representative Shehbaz Shah giving the invitation letter to the hunger striker Anand Londhe for the meeting held in the Ministry regarding the wine shop issue.esakal
Updated on

Dhule News : शहराच्या मध्यवर्ती भागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील वाइन शॉप हटविण्याच्या मागणीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. ८) सकाळी सव्वाअकराला मुंबई मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

बैठकीला या विषयावर धुळ्यात उपोषण करणाऱ्या आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. बैठकीचे पत्र त्यांच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांना दिले. (MLA Farooq Shah statement Ministry meeting today regarding wine shop dhule news)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी पुतळ्यामागील विनोद वाइन शॉप तेथून हटविण्यात यावे, या मागणीसाठी आझाद समाज पार्टीतर्फे धुळ्यात आंदोलन सुरू आहे.

मागणीसाठी पक्षाचे आनंद लोंढे, भय्यासाहेब वाघ यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या सात दिवसांपासून क्युमाइन क्लबसमोर उपोषणाला बसले आहेत. याप्रश्‍नी शहरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

दरम्यान, या प्रश्‍नावर मंत्री श्री. देसाई यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक लावून विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन आमदार शाह यांनी ३ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांना दिले होते.

MLA Farooq Shah's representative Shehbaz Shah giving the invitation letter to the hunger striker Anand Londhe for the meeting held in the Ministry regarding the wine shop issue.
Dhule Polio Vaccination : बालकांना ३ मार्चला देणार पोलिओ लस : जिल्हाधिकारी गोयल

या आश्‍वासनानुसार मंत्री देसाई यांच्या दालनात गुरुवारी बैठक झाली. बैठकीस आमदार शाह, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित असतील.

उपोषणकर्त्यांनाही बैठकीला निमंत्रित केल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांचे प्रतिनिधी शहेबाज शाह यांच्या हस्ते उपोषणकर्ते श्री. लोंढे यांना देण्यात आले.

या वेळी मुकुंद शिरसाठ, राज चव्हाण, रवी नगराळे, सतीश अमृतसागर, संजय अहिरे, भय्यासाहेब वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, चिंतामण थोरात, मुकेश वाघ आदी उपस्थित होते.

MLA Farooq Shah's representative Shehbaz Shah giving the invitation letter to the hunger striker Anand Londhe for the meeting held in the Ministry regarding the wine shop issue.
Dhule News : धुळ्यात ‘हिस्ट्रिशीटर्स’ची आज हजेरी : पोलिस अधीक्षक धिवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.