Dhule News : शिंदखेडा मतदारसंघाला 70 कोटींचा निधी मंजूर : आमदार जयकुमार रावल

Funding
Fundingesakal
Updated on

Dhule News : शिंदखेडा मतदारसंघात पाठपुराव्याअंती रस्ते, इमारती व पुलाच्या कामांसाठी राज्य सरकारने ७० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दिली.(MLA Jayakumar Rawal statement of 70 crore fund approved for Shindkheda constituency dhule news)

नाबार्डमधून करले ते देवकानगर लहान पुलासाठी एक कोटी २४ लाख, मांडळ ते चुडाणे रस्ता सुधारणेसाठी एक कोटी २७ लाख, सुराय ते अक्कलकोस रस्त्यासाठी एक कोटी ४३ लाख, शिंदखेडा-दोंडाईचा मार्गावर बाम्हणे रेल्वे गेटजवळ भूसंपादनाकामी ३५ लाख, चिमठाणेजवळ बुराई नदीवर पुलासाठी १६ कोटी रुपये.

दोंडाईचात अमरावती नदीवर मोठा पूल बांधकामासाठी १५ कोटी ४० लाख, दोंडाईचा शहरातील शहादा वळणरस्ता येथे पाइपलाइन व दुरुस्तीकामी दोन कोटी रुपये, हंबर्डे ते म्हळसर रस्ता सुधारणेसाठी ७० लाख, होळ ते धांदरणे रस्ता कामासाठी दोन कोटी २० लाख, रेवाडी ते रुदाणे रस्त्यासाठी एक कोटी ८० लाख.

Funding
Dhule News : 63 कोटींतून 64 रस्त्यांचे रुपडे पालटणार; सुवर्णजयंती नगरोत्थानअंतर्गत मंजुरी

विरदेल- अमळथे, वरपाडे-नेवाडे-सोनेवाडी-अक्कडसे-वरसूस-सुलवाडे रस्त्यावर बुराई नदीवर मोठा पूल व जोड रस्ताकामी दहा कोटी रुपये, मालपूरजवळ अमरावती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम होण्यासाठी दहा कोटी रुपये, तावखेडा ते दसवेल या रस्त्याच्या मजबुतीकरणासह सुधारणेसाठी पाच कोटी रुपये, दोंडाईचा शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय इमारत बांधकामास एक कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले आहेत, असे आमदार रावल यांनी सांगितले.

Funding
Dhule News : बुधबाजारात व्यवसाय थाटल्यास साहित्य जप्त; पुढच्या बुधवारपासून कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()