धुळे : तापी नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजेसना मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून, त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ही गळती अशीच सुरू राहिली, तर तापी काठावरील गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे ही गळती तत्काळ थांबवावी, अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी विधानसभेत केली. (MLA jaykumar raval Demand to Stop water leakage of Sarangkheda Sulwade Prakasha Barrage Dhule latest marathi news)
तापी नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा ही बॅरेजेस झाली आहेत. या बॅरेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा असतो. हे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी, तसेच अनेक गावांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या बॅरेजेसचे दरवाजे लोखंडी असल्याने व ते कायमस्वरूपी पाण्यात राहिल्याने गंजत असल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे या बॅरेजेसना गळती लागली होती. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचेही दिसून आले. एवढा प्रचंड खर्च करून बनवलेले हे बॅरेजेसचे पाणी वाया जात असल्याने ही गळती थांबविण्यासाठी काहीही प्रयत्न होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने आमदार रावल यांनी ही गळती तत्काळ थांबवावी, अशी मागणी श्री. रावल यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.
उपमुख्यमंत्र्यांकडून ग्वाही
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारंगखेडा बॅरेज प्रकल्पाच्या लोखंडी दरवाजांवर अधो बाजूस असणारा प्रकाशा बॅरेज पूर्ण क्षमतेने भरल्यावर उभ्या उचलद्वारांचा १.२५ मीटर भाग अधोबाजूस पाण्याखाली राहतो. यामुळे द्वारांचा खालील भाग पॅनेल १ गंजून खराब झाला आहे.
यामुळे नदीकाठावरील गावांना कोणताही धोका नाही. सारंगखेडा बॅरेजवरील द्वार निरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने वर्गवारी १ त्रुटींबाबत दुरुस्तीसाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार थोपद्वारे उच्चप्रतीचे गंजरोधक रंगकाम करण्याचे सुचविले आहे.
तसेच पॉलिन, होईस्ट ब्रिज, होईस्ट ॲरेजमेंट, स्टेअर केस आदी भागांची स्वच्छता करून गंजरोधक रंगकाम तातडीने करणेबाबत सुचविले आहे. पावसाळ्यानंतर निरीक्षणाचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार तिन्ही बॅरेजेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम घेणे नियोजित आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितल्याचे आमदार श्री. रावल यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.