Dhule News : ‘इंडिया’चा केंद्र, राज्य सरकारने घेतला धसका : आमदार कुणाल पाटील

MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal
Updated on

Dhule News : आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि इतर घटक पक्ष एकजुटीने सामोरे जातील. केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशात संघटित सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची ताकद आणखी वाढली आहे.

पूर्वी या आघाडीत २६ पक्षांचा समावेश होता. आता ही संख्या २८ झाली आहे. त्यामुळे ‘इंडिया’ नावाचा केंद्र व राज्याच्या भाजप सरकारने धसका घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यघटनेत असलेल्या इंडिया हे नाव मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावा आमदार कुणाल पाटील यांनी केला.

आमदार पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, की वाढती महागाई व बेरोजगारीमुळे जनता भाजप सरकारवर नाराज आहे. त्यात भारत जोडो यात्रेनिमित्त जिल्ह्यात सर्वसामान्यांशी संवाद साधला जात आहे. (mla kunal patil statement about india alliance and central government dhule news)

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसतर्फे देशात सर्वत्र ही यात्रा काढली जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून ही यात्रा सुरू केली होती. १४५ दिवस चार हजार किलोमीटरचा प्रवास करत तो ३० जानेवारीला श्रीनगर येथे संपला.

जिल्ह्याला न्याय द्यावा

यंदा अत्यल्प पावसामुळे बळीराजा संकटात आहे. खरिपातील पिके करपली. शासनाने बीड, जळगाव जिल्ह्यात पीकविम्याची अग्रिम रक्कम नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली. याबाबत धुळे व नंदुरबार जिल्ह्याला उपेक्षित, वंचित ठेवले आहे. पालकमंत्र्यांनी दुष्काळी स्थितीची दखल घेतलेली नाही.

सरकारने जिल्ह्याला न्याय द्यावा. केंद्रातील नऊ वर्षे झालेले भाजपचे सरकार, राज्य सरकार स्वतःला सर्वसामान्यांचे सरकार म्हणते, पण त्यांची कृतीत शून्य आहे. सरकारचे उत्पन्न, खर्च, सार्वजनिक कर्ज, विदेश व्यापार आदी संबंधी धोरणे भाववाढीला जबाबदार असतात. त्यामुळे भाववाढ नियंत्रणाच्या जबाबदारीतून सरकारला अंग काढून घेता येणार नाही.

मोदी सरकार अपयशी

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे तर दूर उलट खत अनुदान, कृषी, संलग्न क्षेत्रावरील खर्च कपात व ग्रामीण विकासाकडे दुर्लक्षाचा फटका उत्पन्नातील घटीच्या रूपाने शेतकऱ्याला बसत आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Kunal Patil
Dhule Rain News : धुळ्यात पावसाचे ‘कमबॅक’! महिन्यानंतर हजेरी; पेठ भागात वीज कंपनी ‘फेल’

शिंदे सरकारच्या काळात राज्यातील शेतकरी असहाय झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शेवटपर्यंत मदत मिळाली नाही. उलट खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी साहित्याच्या दरात वाढ झाली.

मोदी सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी ठरलेले आहे. मराठा आरक्षणप्रश्‍नी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून सरकारने आपला खरा चेहरा राज्यासमोर आणला आहे. मराठा, धनगर, ओबीसी आदी विविध घटकांना आरक्षणाचे गाजर निवडणुकीत दाखविले गेले, असे आमदार पाटील म्हणाले.

बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, मुज्जफर हुसेन, यशवंत खैरनार, गुलाबराव कोतेकर, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, अशोक सुडके, साबीर शेख, पंढरीनाथ पाटील, प्रमोद जैन, भानुदास गांगुर्डे, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.

जागावाटपाविषयी भूमिका

आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू व जिंकू. धुळे लोकसभा मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली तरी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. मात्र, ही जागा काँग्रेसने लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांसह माझा आग्रह आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

सर्वसामान्यांना आपली वाटल्याने भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने १३ सप्टेंबरपर्यंत जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. सर्वसामान्य माणसाला जोडणे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

MLA Kunal Patil
MLA Raju Patil : निवडणूका आल्याने यांचे फार्स झाले चालू; इंडिया आघाडी व महायुतीवर मनसेचा टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.