Dhule News : पिकांचे मोठे नुकसान, तत्काळ पंचनामा करा : आमदार कुणाल पाटील

Dhule : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Crop Damage (file photo)
Crop Damage (file photo) esakal
Updated on

Dhule News : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करावा व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान, आमदार पाटील यांनी तहसीलदारांनाही तातडीच्या पंचनाम्याच्या सूचना दिल्या. (MLA Kunal Patil statement Heavy loss of crops immediate Panchnama)

धुळे तालुक्यासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे आधीच दुष्काळात होरपळणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, दादर या रब्बी पिकांसह टरबूज, पपई, भाजीपाला व इतर फळ पिकांचेही नुकसान झाले आहे.

ही सर्व पिके काढणीला आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. (latest marathi news)

Crop Damage (file photo)
Dhule Municipality News : मनपाचे 1,728 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर; हद्दवाढीत 22 जलकुंभ

या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाला संयुक्त पंचनामा करण्याच्या सूचना करून शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान, अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी धीर न सोडता नैसर्गिक संकटाचा खंबीरपणे सामना करावा. शेतकऱ्यांवर आलेल्या प्रत्येक संकटात मी सोबत असून, शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळावी म्हणून विधानसभेसह रस्त्यावर लढाई लढण्यास सज्ज आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Crop Damage (file photo)
Dhule News : शिरपूरच्या पशुबाजारात पाऊण कोटीची उलाढाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.