Dhule News : आमदारांनी आणले, अभियंत्यांनी गमावले; जैतपूर-थाळनेर रस्त्याची दुरवस्था

आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांनी दोन वर्षांत रस्त्यांची शेकडो कामे मंजूर करून आणली, मात्र निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अल्पावधीतच हे रस्ते निरुपयोगी ठरले आहेत.
Gravel spread due to uprooting of patchwork on Jaitpur-Shirpur road.
Gravel spread due to uprooting of patchwork on Jaitpur-Shirpur road.esakal
Updated on

Dhule News : उखडून वर आलेली खडी, उघडे पडलेले डांबराचे ठिगळ, गायब झालेल्या साइडपट्ट्या, चौफेर उडणारी धूळ आणि जीव मुठीत घेऊन वाहने चालविणारे ग्रामस्थ असे जैतपूर-थाळनेर रस्त्यावरील सध्याचे चित्र आहे.

येथून ये-जा करताना वाहन खडीवरून कधी घसरेल आणि कधी प्राणांतिक अपघात होईल याची सातत्याने भीती वाहनधारकांना असते. (MLA sanctioned hundreds of road works but engineers used substandard materials to render these roads useless within short period of time dhule news)

ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांनी दोन वर्षांत रस्त्यांची शेकडो कामे मंजूर करून आणली, मात्र निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अल्पावधीतच हे रस्ते निरुपयोगी ठरले आहेत.

त्यांच्या दुरुस्तीबाबत सार्वत्रिक ओरड झाल्यानंतर जी डागडुजी करण्यात आली, ती अधिक निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याचे ठळक उदाहरण जैतपूर-थाळनेर रस्ता ठरला आहे. रस्त्याची दुरवस्था पाहता तो काही महिन्यांपूर्वी दुरुस्त केला असेल यावर कोणाचाच विश्वास बसत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष घालण्यात पूर्णत: अपयशी ठरला असून, आमदारांचे परिश्रम या विभागाच्या अभियंत्यांनी कवडीमोल ठरविले आहेत. जैतपूर फाटा ते थाळनेर येथील पेट्रोलपंपापर्यंतचा हा रस्ता सुरवातीपासून वादात आहे. तळभागाचे पुरेसे सपाटीकरण न करता जेमतेम साहित्य वापरून बेस तयार करण्यात आला.

त्यावर सरफेस केल्याने अत्यंत पातळ स्वरूपाचा रस्ता तयार झाला. परिणामी निर्मितीनंतर काही दिवसांतच तो ठिकठिकाणी उखडून वाहतुकीसाठी निरुपयोगी ठरला. रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनधारकांनी त्याबाबत ओरड करून अभियंत्यांना धारेवर धरले.

Gravel spread due to uprooting of patchwork on Jaitpur-Shirpur road.
Dhule Municipality News : प्रशासकांकडून चांगल्या मनपा शाळांचे स्वप्न! महिला, दिव्यांग कल्याणावरही भर

त्यामुळे या रस्त्यावर ६०० ते ८०० मीटर अंतराचे पॅचवर्क टाकण्याची वेळ विभागावर ओढवली. मात्र त्या कामातही साहित्याची बचत करण्याच्या हेतूने अत्यंत कमी डांबर, खडीचा वापर झाला. त्यामुळे हे ठिगळही आता निघून गेले आहे.

रस्त्याची खडी, त्याखालील माती उघडी पडली असून, धुळीचे साम्राज्य या रस्त्यावर असते. विशेषत: वाठोडा फाटा ते थाळनेर पेट्रोलपंप या अंतरादरम्यान रस्त्याची पुरती वाताहत झाल्याचे दिसून येते. यापूर्वी घोडसगाव-बभळाज रस्त्याचीही अशीच दुर्दशा झाली होती. त्यापाठोपाठ जैतपूर फाटा-थाळनेर रस्त्याची वाट लागल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

अभियंत्यांचे दुर्लक्ष

या रस्त्याच्या कामावर देखरेखीची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. ती जबाबदारी असलेल्या कनिष्ठ अभियंत्याने एकाच वेळी शिरपूर आणि धुळे येथे कर्तव्यावर हजर राहण्याची कामगिरी करून दाखविल्याचेही बोलले जाते.

त्याच्या गैरहजेरीत काम पूर्ण होऊन त्याची देयके अदा केली जात असतील तर अभियंत्यांची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामाचे देयक अदा केले नसल्यास थांबवावे किंवा दिले असल्यास त्याची वसुली करावी, अशी मागणी केली जात आहे.

"आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानंतर त्यांनी आमच्या परिसरासाठी हा रस्ता मंजूर करून आणला. मात्र कंत्राटदार-अभियंत्यांच्या संगनमताने काही महिन्यांतच त्याची वाट लागली आहे. या नुकसानाची संबंधितांकडून वसुली करावी व अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी आमची मागणी आहे."-चिंतामण चौधरी, ग्रामस्थ

Gravel spread due to uprooting of patchwork on Jaitpur-Shirpur road.
Dhule News : खळबळजनक! विरदेलला अल्पवयीन मुलीचा गोणपाटात सापडला मृतदेह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.