Dhule Civil Hospital: पूर्ववत क्षमतेने वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आमदार शाह मंत्र्यांकडे

Minister Tanaji Sawant, MLA Farooq Shah and officials attended the joint meeting on the issue of district hospital in Dhule.
Minister Tanaji Sawant, MLA Farooq Shah and officials attended the joint meeting on the issue of district hospital in Dhule.
Updated on

Dhule Civil Hospital: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी साक्री रोडवर असलेल्या जिल्हा शासकीय रूग्णालयात क्षमतेने वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. त्याबाबत तक्रारी आणि सर्व पातळीवर नाराजी सूर असतो.

या स्थितीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष होत असते. ते लक्षात घेत आमदार फारुक शाह यांनी या रूग्णालयास श्रेणीवर्धनातून दोनशे खाटा मिळाव्यात, पूर्ववत निरनिराळ्या वैद्यकीय सेवा गरजूंना मिळाव्यात, अशी मागणी या विभागाचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली. त्यांनी संयुक्त बैठकीनंतर दोनशे खाटांद्वारे श्रेणवर्धनाचा स्वागतार्ह निर्णय घेतल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली. ( MLA Shah to minister to get medical services in restored capacity dhule civil hospital news)

धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा शासकीय रूग्णालय आहे. त्याचे श्रेणीवर्धन दोनशे खाटांमध्ये करणे, औषधसाठा पुरविणे, स्वच्छता कर्मचारी वाढविणे, सर्जरी विभाग सुरू करणे यासह निकषीत विविध वैद्यकीय सेवा मिळणे, रुग्णालयाचे अद्यायवतीकरण संदर्भात आमदार शाह यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी मंत्र्यांनी त्यांच्या दालनात सोमवारी (ता. १८) विशेष बैठक बोलाविली. बैठकीत जिल्हा शासकीय रूग्णालयाचे श्रेणीवर्धन दोनशे खाटांमध्ये करण्याचा आदेश दिला गेल्याचे आमदार शाह यांनी सांगितले.

रूग्ण, नातेवाईकांचे हाल

यावेळी आमदार शाह म्हणाले, की सार्वजनिक आरोग्य मंत्रालयांतर्गत साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात पूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयांतर्गत चक्करबर्डीतील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालय कार्यरत होते. या दोन्ही रूग्णालयांचा गरजू रूग्णांना मध्यवर्ती भागात लाभ मिळत होता. कालांतराने हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा सर्वोपचार रूग्णालय चक्करबर्डी येथे स्थलांतरित झाले. ते शहरापासून १० किलोमीटरवर आहे. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होतात.

Minister Tanaji Sawant, MLA Farooq Shah and officials attended the joint meeting on the issue of district hospital in Dhule.
Dhule News: धुळे तालुका शिक्षण विभागात 47 पदे रिक्त; पदवीधर शिक्षकांची संख्या अधिक

बैठकीत विविध मुद्दे

पर्यायाने अनेक गरजूंपुढे वेळेचा प्रश्‍न व खिशाला न परवडणारे उपचार खासगी रूग्णालयात करावे लागतात. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले जिल्हा शासकीय रूग्णालय अधिक अद्ययावत होणे गरजेचे आहे.

त्याकडे श्री. शाह यांनी मंत्री सावंत यांचे लक्ष वेधले. संयुक्त बैठकीत जिल्हा शासकीय रूग्णालयाचे श्रेणीवर्धन दोनशे खाटांमध्ये करणे, औषधसाठा पुरविणे, स्वच्छता कर्मचारी वाढविणे, सर्जरी विभाग सुरू करणे, रुग्णालयाचे अद्यावतीकरण करणे, पुरेसे कर्मचारी नियुक्त करणे आदींसदर्भात चर्चा झाली. त्यात जानेवारीत जिल्हा शासकीय रूग्णालयाचे श्रेणीवर्धन दोनशे खाटांमध्ये करण्याचा निर्णय मंत्री सावंत यांनी घोषित केला.

कर्मचारी भरतीचे निर्देश

जिल्हा रूग्णालयात तातडीने आवश्यक तो औषध पुरवठा करणे, रुग्णालयातील स्वच्छ्तेसाठी कर्मचारी आणि इतर आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी यंत्रणेला दिलेत, अशी माहिती आमदार शाह यांनी दिली. विभागाचे आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. विजय कंधेवार, उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर आदी उपस्थित होते. धुळेकरांसाठी हा निर्णय नववर्षाची भेट असल्याची प्रतिक्रियाही आमदार शाह यांनी दिली.

Minister Tanaji Sawant, MLA Farooq Shah and officials attended the joint meeting on the issue of district hospital in Dhule.
Dhule News: पोलिसातील संवेदनशीलता दिव्यांगांच्या मदतीला! जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सहृदयतेचा संदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.