Nandurbar Rain News: मॉन्सूनचा लहरीपणा; 9 वर्षांत चारच वेळा पावसाने ओलांडली सरासरी

Rain
Rainesakal
Updated on

Nandurbar Rain News: नंदुरबार जिल्ह्यातून मॉन्सून परतण्याची चिन्हे आहेत. असे असताना तळोदा तालुक्यात मात्र यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जेमतेम सरासरी गाठली आहे. त्यात मागील नऊ वर्षांत तालुक्याची सरासरी ७८८ मिलिमीटर केवळ चार वेळा ओलांडली गेली आहे.

त्यामुळे मॉन्सूनचा लहरीपणा दिवसेंदिवस ठळक बनत असून, लहरीपणा असाच सुरू राहिल्यास भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच जाणवणार असल्याचे जाणकार सांगतात. (monsoon is unstable Rainfall exceeded average four times in 9 years )

त्यात यंदा ७९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र हेच पर्जन्यमान वाढण्यासाठी निसर्गाचा समतोल टिकविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. कधीकाळी तळोदा तालुका चांगल्या पर्जन्यमानासाठी ओळखला जात होता.

मात्र मागील १५ ते २० वर्षांपासून तालुक्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण कमी कमी होत गेल्याच्या अनुभव शेतकऱ्यांना आहे. कधी नव्हे तेवढी भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाच ते दहा फुटांवर असणारे भूगर्भातील पाणी आता शंभर ते दीडशे फुटांपर्यंत पोचले आहे.

काही भागात तीच पातळी २०० फुटांपेक्षा जास्त गेली आहे. या परिस्थितीला कमी झालेले पर्जन्यमान कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

२०१५ ते २०२३ या नऊ वर्षे कालावधीतील पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता तालुक्याची पर्जन्यमानाची असलेली सरासरी ७८८ मिलिमीटरपर्यंत पाऊस जेमतेमच पोचत आहे. त्यात २०१५, २०१७ , २०१९ व २०२३ या चारच वर्षे पावसाने सरासरी पार गेली होती.

त्यामुळे तालुक्यात भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जाण्यास कमी पर्जन्यमानच कारणीभूत असल्याचे दिसून येते. बेसुमार झालेली जंगलतोड, जाणीवपूर्वक जंगल वाढविण्यात असलेली उदासीनता हीदेखील कमी पावसाची कारणे सांगितली जातात.

Rain
Dhule Rain News : आता नदी-नाले वाहू दे देवा.. एवढा बरस..! 35 दिवसांनी पावसाचे पुनरागमन

दुसरीकडे तळोदा तालुक्यात बागायती शेती सर्वांत जास्त केली जात असल्याने भूगर्भातील पाण्याच्या उपसा कूपनलिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतीच्या सिंचनासाठी कोणतेही मोठे धरण नाही अथवा योजना नाही. तालुक्यात कोणतेही मोठे धरण नसल्याने पाणी अडविणे व जिरविणे जिकिरीचे जाते.

त्यामुळे पावसावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे चांगल्या पावसासाठी निसर्गाचा समतोल टिकून राहणे आवश्यक आहे.

दुसरीकडे तालुक्यात रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर व धनपूर असे पाच लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. रापापूर व इच्छागव्हाण हे निर्माणाधीन प्रकल्प आहेत. अनेक वर्षांपासून ते रखडले आहेत. त्यात यंदाच्या पावसाळ्यात केवळ दोनच वेळा लघुपाटबंधाऱ्यांच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहिले आहे.

त्यामुळे भविष्यात पर्जन्यमान वाढले नाही तर पाण्याचे दुर्भिक्ष तळोदा तालुक्याला जाणवणार असल्याचे जाणकार आतापासून सांगत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांच्याच सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे.

Rain
Nashik Rain News : पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्गही घटविला; गंगापूरचा विसर्ग 9088 वरून 1252 क्यूसेस

तळोदा तालुक्यात २०१५ ते २०२३ या कालावधीत झालेल्या पावसाची आकडेवारी

वर्ष पाऊस मिलिमीटरमध्ये

२०१५ ८००

२०१६ ६२४

२०१७ ९२८

२०१८ ५३०

२०१९ १०२९

२०२० ५९९

२०२१ ६५९

२०२२ ७५०

२०२३ ७९१

Rain
Nashik Rain News : जिल्ह्यातील 10 धरणे ‘ओव्हरफ्लो’; 24 धरणांमध्ये 84 टक्के साठा
Rain
Pune Rain : पावसामुळे पुणे विभागातील पाणी टंचाईला दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.