Ajit Pawar News : 5 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा

While handing over the affidavit of the workers of the district to the NCP (Ajit Pawar group) state president Sunil Tatkare, the district president Dr. Abhijit More and officials.
While handing over the affidavit of the workers of the district to the NCP (Ajit Pawar group) state president Sunil Tatkare, the district president Dr. Abhijit More and officials. esakal
Updated on

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात राजकीय परिस्थिती बदलली. (More than 5 thousand activists support Ajit Pawar group nandurbar news)

पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यातून पाठिंब्याबाबतचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपासून जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली गेली.

बैठका आयोजित करण्यात आल्या. एकमुखाने बहुतांश कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली भूमिका मान्य करून पाठिंबा जाहीर केला.

संपूर्ण जिल्ह्यातून पाच हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी या वेळी आपले प्रतिज्ञापत्र भरून दिले. कार्यकर्त्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ. मोरे यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While handing over the affidavit of the workers of the district to the NCP (Ajit Pawar group) state president Sunil Tatkare, the district president Dr. Abhijit More and officials.
Ajit Pawar : माझे कौतुक केले तर तुम्हाला का वाईट वाटतय - अजित पवार

या वेळी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासह पक्षसंघटनेवर विशेष लक्ष देत प्रत्येक गावात संघटना सक्षम करावी, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घ्यावे, असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्षांनी केले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा सोनगरे, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. नितीन पवार, माधव पाटील, संजय खंदारे, संतोष पराडके, छोटू कुवर, उषा तायडे, ॲड. अश्विनी जोशी, मंजुळा मुसळदे, रेश्मा पवार, गोविंद सामुद्रे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

While handing over the affidavit of the workers of the district to the NCP (Ajit Pawar group) state president Sunil Tatkare, the district president Dr. Abhijit More and officials.
Ajit Pawar News : अजित पवारांच्या पुढाकाराने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत आज बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.