Nandurbar News : श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रकाशात मोटारसायकल रॅली

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथील विविध सेवाभावी संस्था, ग्रामस्थांतर्फे प्रकाशा तीर्थक्षेत्रातील मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी, रोषणाई केली असून, पताका, ध्वज लावून गाव भगवेमय केले.
Ram devotees participating in grand motorcycle rally. Streets and neighborhoods decorated on the occasion of Pranpratistha ceremony.
Ram devotees participating in grand motorcycle rally. Streets and neighborhoods decorated on the occasion of Pranpratistha ceremony.esakal
Updated on

Nandurbar News : प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथील विविध सेवाभावी संस्था, ग्रामस्थांतर्फे प्रकाशा तीर्थक्षेत्रातील मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी, रोषणाई केली असून, पताका, ध्वज लावून गाव भगवेमय केले आहे.

यानिमित्त विधिवत पूजाअर्चेसोबतच श्रीरामाची भव्य सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी (ता. २१) सकाळी येथील गोतमेश्वर मंदिरापासून श्रीरामाच्या जयघोषात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. (Motorcycle rally on occasion of Sri Ram anniversary nandurbar news)

अयोध्येत श्रीरामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (ता. २२) होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशा येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सात ते दहा पुरोहितांकडून महारुद्राभिषेक केला जाईल.

दहा ते दुपारी एकपर्यंत राम जप, रामधुनीसोबतच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था विश्वस्तांनी केली आहे. त्यानंतर एक ते दोनच्या दरम्यान महिलांकडून सत्संग कार्यक्रम होईल.

दुपारी दोनला श्रीरामाची भव्य शोभायात्रा निघेल. सायंकाळी साडेसहाला सामुदायिक रामरक्षा पठण व महाआरती केली जाईल. यानिमित्त विविध सेवाभावी संस्था, युवक मंडळे, मंच व प्रकाशा ग्रामस्थांतर्फे विविध मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी, रोषणाई केली आहे.

गावात नैसर्गिक पालापाचोळा, पताका, ध्वज लावून भगवेमय केले आहे. अंगण व मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्या टाकून गाव सुशोभित व सज्ज करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी दोननंतर ठिकठिकाणाहून श्रीरामाच्या सात मिरवणुका निघतील.

Ram devotees participating in grand motorcycle rally. Streets and neighborhoods decorated on the occasion of Pranpratistha ceremony.
Ayodhya Ram Mandir : अवघे मालेगाव भक्तिरसात चिंब; शोभायात्रेचा उत्साह लक्षवेधी

त्यात श्रीराम मंदिराची मिरवणूक अग्रस्थानी असेल. सोनार गल्ली मंडळ, भोईराज मंडळ, भुताताळी मंडळ, पटेल गल्ली मंडळ, तोताराम महाराज मंदिर मंडळ, चौधरी गल्ली मंडळ, गढी मंडळ आदी मिरवणुका निघणार आहेत. सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, जटायू आदींचे सजीव देखावे असतील.

मिरवणुकीत आबालवृद्धांसह महिलांची संख्या लक्षणीय राहणार आहे. ठिकठिकाणी निघणाऱ्या सातही मिरवणुका श्रीरामाच्या भव्य शोभायात्रेला जोडल्या जातील. गावातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा नेण्यात येईल.

चौकाचौकांत विविध मंडळांतर्फे भंडारावाटप केला जाईल. विशेष म्हणजे भंडारा कार्यक्रमासाठी महिलांनी स्वयंस्फूर्तीने शिधा दिला आहे.

रविवारी सकाळी येथील भोई गल्लीतून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. श्रीरामाच्या गीतांचा भक्तिमय सूर विविध जयघोष करीत गावाच्या प्रमुख मार्गावरून नेण्यात आली. तीत शेकडो रामभक्त सहभागी झाले होते.

Ram devotees participating in grand motorcycle rally. Streets and neighborhoods decorated on the occasion of Pranpratistha ceremony.
Ayodhya Ram Mandir Inauguration : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा भारत उत्सुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.