Dhule News : शेतकऱ्यांचे अनेक दशकांपासूनचे सिंचनाचे स्वप्न साकार करण्यासाठी खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करत विशेष बाब म्हणून सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल दोन हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आणला.
या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन वर्षांत ‘तापी’चे पाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पोचेल अशी ग्वाही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.(MP Dr Subhash Bhamre statement of Tap water in farmers' fields in 2 years dhule news)
विकसित भारत संकल्प यात्रा शनिवारी (ता.१६) मेलाणे (ता. शिंदखेडा) येथे आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संजीवनी शिसोदे, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी कपिल वाघ, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील.
समुदाय आरोग्याधिकारी डॉ. मोरे, मेलाणेच्या सरपंच निर्मला बोरसे, उपसरपंच योगेश भिल, ग्रामपंचायत सदस्या सरला बोरसे, लोपबाई बोरसे, उषाबाई ठाकरे, सदस्य दत्तात्रेय बोरसे, राजाराम बोरसे, माजी सरपंच गंपू बोरसे, विजय बोरसे, पोलिस पाटील ब्रिजलाल बोरसे, सीताराम फुले, हिलाल भिल, नंदलाल मोरे आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारतर्फे देशातील विविध घटकांच्या विकासासाठी ७० हून अधिक योजना राबविण्यात येत आहेत. यातून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्याहस्ते गावातील लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डसह विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
विकासाला चालना
खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नांमुळे उद्योगांसाठी आवश्यक महामार्गांचे जाळे, सुलवाडे-जामफळ योजनेद्वारे पाण्याची उपलब्धता, तसेच धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. यातून नरडाणा परिसराच्या विकासाला चालना मिळत असल्याचे सभापती श्रीमती शिसोदे म्हणाल्या.
बिलाडी येथेही संकल्प यात्रा
बिलाडी (ता. धुळे) येथेही शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रा पोचली. तेथे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
यावेळी भाजप किसान आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, उत्कर्ष पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, रितेश परदेशी, पंचायत समिती सदस्या उषा पाटील, सुभाष पाटील, हरीश शेलार, सरपंच अरस्तोलबाई खैरनार, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी केंद्रप्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.