Dhule News : बोरकुंड आणि रतनपुरा (ता. धुळे) जिल्हा परिषद गटातील प्रमुख पाच रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. साडेपाच कोटींच्या निधीतून होणाऱ्या या कामांमुळे दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.
भाजपचे पदाधिकारी तथा इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही रस्ते सुविधा बळकट होणार आहे. (MP for asphalting main five roads in Zilla Parishad group Bhoomi Pujan was performed by Subhash Bhamre dhule news)
भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, श्री. भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर पाटील, सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील.
तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, रितेश परदेशी, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी, माजी उपसभापती भय्यासाहेब पाटील, सदस्य रंगूबाई ठाकरे, बाबाजी देसले, तालुका सरचिटणीस श्याम बडगुजर, माजी सदस्य मुन्ना पवार, डॉ. राजेंद्र पाटील, बोरकुंडचे सरपंच हेमंत भदाणे, राजेंद्र मराठे.
संजय माळी, जुनवणेचे सरपंच योगेश पाटील, धाडरेचे सरपंच राहुल पाटील, हेंद्रूणचे सरपंच गोरख राजपूत, उपसरपंच दीपक कोळी, संजय राजपूत, मोघणचे उपसरपंच विलास पाटील, सुशील गवळी, जिभो पाखले, विलास पाटील, किशोर पाटील, कैलास पाटील, गोरख माळी, मोरदडचे सरपंच गोविंदा पाटील.
गुणवंत पाटील, हरीदास खैरनार, संजय पाटील, नाना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भिरडाईचे सरपंच राजेश पाटील, चांदेचे उपसरपंच रावसाहेब पाटील, नंदाळेचे सरपंच योगेश पाटील, नाणेचे सरपंच अजय राजपूत, विसरणेचे सरपंच रवी पाटील जितू जैन आदी उपस्थित होते. खासदार डॉ. भामरे यांनी मार्गदर्शन केले.
श्री. भदाणे यांनी पाठपुरावा करीत जुनवणे ते हेंद्रूण, होरपाडा ते मांडळ, कुळथे ते नंदाळे बुद्रुक, बोरकुंड ते तरवाडे व तरवाडे ते लोंढरे या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर करून आणला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.