Nandurbar News : जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मोबाईलवर मेसेज व नंतर फोन करून खासदार अमोल कोल्हे यांचा पी.ए. असल्याची बतावणी करीत फसवणूक करणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्र्यंबकेश्वर येथून अटक केली आहे. संशयित मोरंडे पोस्ट मोरचंडी (ता. मोखाडा, जि. पालघर) येथील रहिवासी आहे.
पोलिस अधीक्षक पाटील यांना एक जून रोजी रात्री अज्ञात मोबाईलवरून काम असल्याचा मेसेज आला. त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांना मदत करणेबाबत सांगितले. (MP Kolhe personal assistant Fraud in name Suspect arrested Action by Nandurbar District Local Crime Branch Nandurbar News)
त्या अनुषंगाने उपनिरीक्षक मोहिते यांनी त्या अज्ञात मोबाईल क्रमांकावर कॉल करून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव प्रबोधचंद्र सावंत असे सांगून ते खासदार अमोल कोल्हे यांचे पी. ए. असल्याबाबत कळवून त्यांचे मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असून त्यांना मदत करण्याबाबत सांगितले.
त्यानंतर श्री. मोहिते यांना अज्ञात इसमाने फोन करून सांगितले की, जखमींना रुग्णवाहिकेने शिवाजीनगर (पुणे) येथे घेऊन जाणे असल्याने डिझेलसाठी व जेवणासाठी पैशांची मदत करावी, असे सांगितले.
उपनिरीक्षक मोहिते यांनी अपघातग्रस्तांना मदत व्हावी, या उद्देशाने फोन पे द्वारे त्यांना पैशांची मदत केली. परंतु उपनिरीक्षक मोहिते यांनी सकाळी अपघाताची माहिती घेतली असता नंदुरबार जिल्ह्यात अथवा आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील असा कोणताही अपघात झाला नसल्याचे समजले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांकावर बोलणारे रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबत खोटी माहिती देवून फसवणूक केली म्हणून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना आदेशित करून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नाशिक व पालघर जिल्ह्यात रवाना केले.
पथकास संशयित त्र्यंबक (जि. नाशिक) येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता रविकांत मधूकर फसाळे (वय ३२, रा. मोरंडे पोस्ट मोरचंडी ता.मोखाडा जिल्हा पालघर) असे सांगितले. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी इत्यादींचे मोबाईल क्रमांक दिसून आले. संशयित आरोपीतास त्याच्या ताब्यात मिळून आलेला मोबाईलसह गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.