नवापूरला सागवानी लाकडाचा साठा पकडला; वन विभागाची कारवाई

सागवान लाकडाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत एक लाख रुपये आहे
Teak wood
Teak woodTeak wood
Updated on

नवापूर : वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार नवापूर व चिंचपाडा वन विभागाच्या पथकाने आज बारी (ता. नवापूर) गावात आनंद पुन्या कोकणी यांचे घराची झडती घेतली. त्यात सागवानी लाकडाचे (Teak wood)४४ नग कट साईज 1.180 घ. मि. माल मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार (Market price) अंदाजीत किंमत एक लाख रुपये आहे. सदर अवैध लाकुडसाठा नवापूर वन विभागाच्या आगारात जमा करण्यात आला. ( navapur forest department action teak wood confiscated by bari village)

Teak wood
लळिंग, सोनगीर टोलवर ‘बचती’चा मंत्री नितीन गडकरींचा दावा फोल

नंदुरबार वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग शहादा (प्रादेशिक व वन्यजीव) धनंजय पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून नवापूर वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, वनपाल डि.के जाधव, बी. एस. दराडे, के. एम. बडूरे, वनरक्षक एस.बी. गायकवाड, डी. डी. पाटील, एन. आर .पाटील, एस. ए.खैरनार, एस. डी. बडगुजर, आर. के.पावरा, के.एन.वसावे, एल. एस. पवार, ए. जी. पावरा, ए. बी. पावरा, ए. आर.वळवी, वाहन चालक चमाऱ्या गावित व वनमजूर अनिल गावित वनकर्मचाऱ्यासह बारी गावात जाऊन आनंद पुन्या कोकणी यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईत ४४ साग नग कट साईज 1.180 घ. मि. माल मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत एक लाख रुपये आहे.

Teak wood
Teak woodTeak wood

सदर कारवाईत नवापूर व चिंचपाडा वन विभागाचे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वाहन चालक यांनी भाग घेतला.पुढील कार्यवाही धुळे मुख्य वनसंरक्षक डी व्ही पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा पी.के.बागुल, उमेश वावरे, धुळे विभागीय वनअधिकारी दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Teak wood
राज्यातील अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुदान रखडले

सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()