MSEDCL Nandurbar News : मोबाईल नंबर अपडेट करा वीजसेवेचे SMS मिळवा!

MSEDCL News
MSEDCL News esakal
Updated on

Nandurbar City News : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळविण्यासाठी जिल्ह्यातील ८० टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे.

नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदविलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. (MSEDCL Nandurbar News Mobile Number Update Get Electricity Service SMS Nandurbar News)

MSEDCL News
Nashik News: ग्रामीण रस्ते विकासाच्या निधीत 54 कोटींची कपात; ZPला निधी देतांना जिल्हा नियोजनचा आखडता हात

नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख १७ हजार ३१८ वीजग्राहकांपैकी एक लाख ७५ हजार ५७२ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे.

या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.

८० टक्के घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MSEDCL News
Crime News: धक्कादायक! जन्मदात्याने आपल्या १८ दिवसांच्या बाळाला तीन लाखांत विकलं, कारण...

असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी २४ तास सुरू असणाऱ्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर, https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अ‍ॅपवर नोंदणी करावी.

वीजबिलाचा तपशील व इतर माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपले क्रमांक वरील पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

MSEDCL News
Dhule News : महाबीजचे बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे; जिल्हा व्यवस्थापकांचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.