Dhule Marathon 2024 : मॅरेथॉन मार्गावर साफसफाई ठेवा : अमिता दगडे-पाटील

‘फिट धुळे-हिट धुळे’ हे घोषवाक्य तर ‘रन फॉर पांझरा’ अशी थीम घेऊन रविवारी (ता. ४) धुळ्यात धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन-२) होणार आहे.
Dhule Marathon
Dhule Marathon esakal
Updated on

Dhule Marathon 2024 : ‘फिट धुळे-हिट धुळे’ हे घोषवाक्य तर ‘रन फॉर पांझरा’ अशी थीम घेऊन रविवारी (ता. ४) धुळ्यात धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन-२) होणार आहे.

या मॅरेथॉनच्या मार्गावर स्वच्छता ठेवा, कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत यादृष्टीने उपाययोजना करा, असा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिला आहे. (Municipal Commissioner Amit Dagade Patil statement keep marathon route clean dhule news)

मॅरेथॉनच्या मार्गावर साफसफाई करून मॅरेथॉन सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करावी, मोकाट जनावरे व मोकाट कुत्रे यांचा अडथळा निर्माण करणार नाही याची दक्षता घ्यावी, मॅरेथॉन संपल्यानंतर आपल्या आधिपत्याखालील सर्व कर्मचारी पोलिस कवायत मैदान येथे साफसफाईसाठी नेमण्यात यावेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहून मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याबाबत सूचना कराव्यात.

बांधकाम मटेरिअल उचला

मॅरेथॉन मार्गावरील ज्या ठिकाणी बांधकाम सुरू असेल व संबंधित मालकाने बांधकाम मटेरिअल रस्त्यावर टाकले असेल अशा बांधकाम मालकांना ते बांधकाम व पाडकाम मटेरिअल उचलण्याबाबत नोटीस देऊन ते तत्काळ उचलून घेण्याची कार्यवाही करावी.

कर्मचाऱ्यांकडून मॅरेथॉन मार्गावर पडलेले दगड, विटा आदी कचरा उचलून चांगल्या प्रकारे साफसफाई करून निघालेला कचरा उचलून घ्यावा.

मॅरेथॉन मार्गावरील शाळा, महाविद्यालयातील स्वच्छतागृह, प्रभागातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह यांची साफसफाई करून घ्यावी तसेच मॅरेथॉन संपेपर्यंत संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करावी, अशा सूचना स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

Dhule Marathon
Dhule Municipality News : स्मारके, धार्मिक स्थळांजवळ आता ‘नो चमकोगिरी’; महापालिका महासभेत निर्णय

तसेच कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टलाही याअनुषंगाने निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधून मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर पडलेला कचरा मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी व नंतर उचलण्यात यावा.

तसेच दहा घंटागाड्या पोलिस मुख्यालय येथे सकाळी आठला पोचविण्यात यावे व मार्गावर ज्या ठिकाणी स्टॉल्स लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणी त्वरित कचरा उचलण्याची कार्यवाही करावी, असे आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, मॅरेथॉनसाठी महापालिकेतर्फे काही ठिकाणी कमानी लावण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीनेही मंजुरी घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना गुरुवारी (ता. १) श्रीमती दगडे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Dhule Marathon
Dhule Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()