Dhule Municipality News : निकृष्ट काम खपवणार नाही; थेट तक्रार करा!

काँक्रिट रस्त्यावर डांबराचा लेप चढवून निकृष्ट काम झाकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
dhule municipal corporation
dhule municipal corporationesakal
Updated on

Dhule Municipality News : शहराच्या देवपूर भागातील माजी महापौरांच्या घरासमोरील काँक्रिट रस्त्यावर डांबराचा लेप चढवून निकृष्ट काम झाकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

निकृष्ट कामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. (Municipal Commissioner statement Inferior work will not be tolerated dhule news)

अशा प्रकारे शहरात कुठेही निकृष्ट काम होत असेल तर नागरिकांनीही थेट संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी केले.

दरम्यान, अभियंत्यांच्या हलगर्जीवरही त्यांनी ताशेरे ओढत आपापल्या भागातील कामांवर लक्ष ठेवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर मंगळवारी (ता. २३) स्थायी समितीची सभा झाली.

आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील अध्यक्षस्थानी होत्या. अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, नगरसचिव मनोज वाघ व इतर अधिकारी उपस्थित होते. महापालिकेत प्रशासकराज आले असले, तरी नागरिकांचे प्रश्‍न समजावेत, घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोचावेत, महापालिकेची यंत्रणा लोकांसाठी उपलब्ध आहे.

असा संदेश जावा यासाठी स्थायी समिती व महासभेची परंपरा कायम ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी स्पष्ट केले. शहरातील देवपूर भागात माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचे निवासस्थान ते इंदिरा गार्डनदरम्यानच्या काँक्रिट रस्त्यावर डांबराचा थर टाकण्याच्या प्रकाराचा संदर्भ देत त्यांनी अभियंत्यांची कानउघाडणी केली.

dhule municipal corporation
Dhule Municipality News : ‘पांझरे’च्या एकाच पट्ट्यात वर्षानुवर्षे ‘साफसफाई’; 22 टन कचरा संकलित

संबंधित कामाची माहिती मिळाल्यानंतर मलाही आश्‍चर्य वाटल्याचे त्या म्हणाल्या. आपण डोळे झाकून काम करतोय, मनमानी करायला सोडले आहे का, असे म्हणत त्यांनी संबंधित अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांना सुनावले.

महापालिकेच्या माध्यमातून ज्या-ज्या भागात कामे सुरू आहेत, तेथे संबंधित अभियंत्यांचे लक्ष असले पाहिजे. निकृष्ट काम होणार नाही याबाबत दक्षता घ्या अन्यथा कारवाई करेन, असा इशारा दिला. कामांवर लक्ष ठेवण्याबाबत अभियंत्यांना लेखी आदेश द्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नागरिकांनाही आवाहन

आपापल्या भागातील कामांवर नागरिकांनीही लक्ष ठेवावे व निकृष्ट काम होत असेल तर तक्रार करावी. थेट माझ्याकडेही नागरिक तक्रार करू शकतात, मोबाईल, व्हॉट्सॲपवरदेखील अशा तक्रारी करू शकतात, असे आवाहन श्रीमती दगडे-पाटील यांनी केले.

करप्रश्‍नी संपर्क साधा

मालमत्ता कर आकारणीबाबत प्रधान सचिवांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही होणार आहे. त्यामुळे कर आकारणीबाबत तक्रार असेल तर त्यांनी संपर्क साधावा. तक्रारीची दखल घेतली जाईल, रिव्हेरिफिकेशन होईल. मालमत्ताधारकांनी कर भरावा, असे आवाहन श्रीमती दगडे-पाटील यांनी केले. दरम्यान, ३१ मार्चअखेर किमान ९० टक्के कर वसुलीसाठी सर्वांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

dhule municipal corporation
Dhule Municipality News : सव्वापाच कोटींची कामे, खर्चास मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.