Dhule News : महापालिकेत अवतरणार महिलाराज!

municipal election
municipal electionesakal
Updated on

धुळे : महापौर, स्थायी समिती सभापती (Standing Committee Chairman), महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. ४) या तिन्ही पदांच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे निश्‍चित झाले. (Municipal Corporation election women are required to fill 3 major posts dhule news)

विशेषतः महापौरपदासाठी सुरू असलेल्या स्पर्धेला विराम लागला असून, प्रभाग ४ (ब)च्या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी या स्पर्धेत बाजी मारली. स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदीही अपेक्षेनुसार नामनिर्देशनपत्र दाखल झाले.

तिन्ही प्रमुख पदांवर महिलांची वर्णी लागत असल्याने यानिमित्ताने महापालिकेत ‘महिलाराज’ अवतरणार आहे. विरोधी पक्षांतर्फे कुणीही अर्ज सादर केला नाही, त्यामुळे तिन्ही पदे बिनविरोध होतील. ८ फेब्रुवारीला यावर शिक्कामोर्तब होईल.

चालू पंचवार्षिकमधील दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत प्रदीप कर्पे यांनी राजीनामा दिल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यासाठी पक्ष पातळीवर इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले. यात इच्छुकांची नावे वाढतच झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

municipal election
Dhule News : लोखंडी प्लेट लांबविणाऱ्या चोरट्यांना काही तासांतच बेड्या

या स्पर्धेत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. ४) अखेर चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका श्रीमती चौधरी यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केल. श्रीमती चौधरी यांच्या अर्जावर पक्षाच्या नगरसेविका भारती माळी, नगरसेवक संजय जाधव सूचक, तर वालिबेन मंडोरे, बन्सीलाल जाधव अनुमोदक आहेत.

कुलेवार, अग्रवाल यांचे अर्ज

स्थायी समिती सभापतिपदासाठी प्रभाग ७ (क)च्या भाजपच्या नगरसेविका किरण कुलेवार यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर कल्याणी अंपळकर, प्रतिभा चौधरी सूचक, तर सारिका अग्रवाल, कल्याणी अंपळकर अनुमोदक आहेत. तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपतर्फे प्रभाग १८ (क)च्या नगरसेविका सारिका अग्रवाल यांनी दोन अर्ज सादर केले.

municipal election
NMC News : महापालिकेच्या संगणकीय प्रणालीत दोष

त्यांच्या अर्जावर वंदना थोरात सूचक, तर कशिश उदासी अनुमोदक आहेत. महिला व बालकल्याण समिती उपसभापतिपदासाठी भाजपच्या १ (ड)च्या नगरसेविका विमलबाई पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर कशिश उदासी सूचक, तर वंदना थोरात अनुमोदक आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, नगरसेवक संजय जाधव, बन्सी जाधव, नंदकिशोर सोनार, वालीबेन मंडोरे, वंदना थोरात, कल्याणी अंपळकर, विनोद मोराणकर, ओमप्रकाश अग्रवाल, गुड्डू अहिरराव, गजेंद्र अंपळकर, प्रवीण अग्रवाल, राकेश कुलेवार, बबन थोरात, शशी मोगलाईकर, चंद्रकांत गुजराथी, अल्पा अग्रवाल, मायादेवी परदेशी आदी उपस्थित होते. दरम्यान, महापौरपदासाठी एमआयएमचे नगरसेवक सईद बेग यांनी अर्ज घेतला होता. मात्र, त्यांनी तो दाखल केला नाही.

municipal election
NMC News : पेस्ट कंट्रोलच्या वादग्रस्त ठेकेदाराला मुदतवाढीचा नवा विक्रम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()