Dhule News : सर्रास पैसे मागण्याची हिंमत कशी? महापालिकेतील प्रकार

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातील काही कर्मचारी पैसे मागतात, अशी तक्रार काही ठेकेदारांसह अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांची कानउघाडणी केल्याची महापालिकेत जोरदार चर्चा आहे.

एखाद्या कामासाठी, फाइल क्लिअर करण्यासाठी सर्रास संबंधितांकडे पैसे मागण्याएवढी हिंमत कर्मचाऱ्यांमध्ये अचानक आली की यापूर्वीच होती, ती आता वाढली आहे, हा प्रश्‍न आहे.

इतर कमावतात मग आपणच का मागे राहायचे, अशी भावना बळावल्याची शक्यताही नाकारता येत नाही. (municipal employees ask money for work in dhule municipal corporation news)

धुळे महापालिकेतील विविध विभागांवर भ्रष्टाचाराचे आरोप नवीन नाहीत. याबाबत आरोप झाल्यानंतरही संबंधितांकडून त्याला उत्तरे दिली जात नाहीत, आरोप खोडून काढले जात नाहीत. त्यामुळे महापालिकेतील यंत्रणा निर्ढावलेली असल्याची ख्याती आहे.

दरम्यान, महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याची तक्रार काही ठेकेदार, अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.

या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधितांना जाब विचारला चांगलीच कानउघाडणी केली व कारवाईचा दमही भरला, अशी चर्चा महापालिकेत आहे. असा प्रकार खरा असेल तर महापालिकेसाठी ही बाब लाजीरवाणी आहे.

एखाद्या विभागातील कर्मचारी परस्पर पैसे मागतात, की कुणाच्या सांगण्यावरून ते असले धंदे करतात, हा संशोधनाचा भाग आहे. एकूणच प्रशासकीय कामकाजात वरिष्ठांचा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule News: ...तर देवपूरकरांकडून ‘ती’ रक्कम वसूल होणार; मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया

ना ओळखपत्र ना गणवेश

महापालिकेत सध्या कोण कर्मचारी, कोण ठेकेदार, कोण एजंट हेच कळत नाही. महापालिकेत फिरणाऱ्या अशा अनेक लोकांच्या हातात महापालिकेच्या फायली पाहायला मिळतात. यापूर्वी अशा प्रकारांना तत्कालीन आयुक्तांनी आळा घातल्याने शिस्त लागली होती.

अगदी ठेकेदाराच्या हातातही महापालिकेची फाइल दिसायला नको, असा दंडक घातला होता. आता मात्र हे चित्र धूसर झाले आहे. शिवाय कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रही नाही. अनेकजण चित्र-विचित्र, फॅशनेबल कपडे घालून वावरतात. त्यामुळे एकूणच महापालिकेचा कारभार काही ठिकाणावर नाही, अशी प्रक्रिया महापालिकेतच उमटताना दिसते.

Dhule Municipal Corporation
Dhule News: देऊरला रानडुकरांकडून डाळिंब बागेचे नुकसान; साडेसहा एकर क्षेत्रातील डाळिंबांचा फडशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.