धुळे : महापालिकेच्या जुन्या व नव्या इमारत परिसरातील अनधिकृत बॅनर अखेर महापालिका यंत्रणेने गुरुवारी (ता. २) सायंकाळी काढून टाकले. महापालिकेपासून १०० मीटर परिसरात बॅनर, होर्डिंग काढण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेशही महापालिका आयुक्तांनी काढला आहे. (municipal system removed unauthorized banners from old new buildings of municipal corporation Dhule news)
शहरात अनधिकृत बॅनर, होर्डिंग लावण्याचा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला तसेच इतर विविध कार्यक्रम, वाढदिवसाच्या बॅनरबाजीचे पीक नेहमीच पाहायला मिळते. शहरातील विविध चौक, रस्त्यांवर हे चित्र आजही मोठ्या प्रमाणावर दिसते.
ज्या यंत्रणेकडे शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंगबाबत कारवाईचे अधिकार आहेत, त्या महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ, समोर व परिसरातदेखील असे बॅनर लावायची स्पर्धा पाहायला मिळते. विशेष म्हणजे या परिसरात बॅनर लावण्यास मनाई असताना आताही तसाच प्रकार आताही घडला.
हा प्रकार रोखण्यासाठी अखेर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला. गुरुवारी (ता. २) सायंकाळी महापालिकेसमोर लावण्यात आलेले मोठमोठे बॅनर अतिक्रमण निर्मूलन विभाग, स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे बॅनर हटविले.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, धुळे महापालिकेच्या ठरावानुसार महापालिकेच्या परिसरापासून १०० मीटरपर्यंत कोणतेही होर्डिंग, बॅनर लावू नये, असा ठराव महासभेने मंजूर केला आहे. या ठरावाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आवारात किंवा प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर लावण्यात आलेले बॅनर व होर्डिंग काढण्याचा आदेश आयुक्तांनी काढला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.