Dhule Crime News : ‘अण्णा थांब’ म्हणत बागूलांना थांबवले; अन दुचाकी थांबवताच...

ही घटना शुक्रवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली.
Murder
Murderesakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता यशवंत सुरेश बागूल (वय ४०, रा. मिलिंद सोसायटी, कुमारनगर, साक्री रोड) यांची संशयित दोघांनी गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आणि चाकूने वार करीत हत्या केल्याने खळबळ उडाली. (Murder of Bagul in Dhule crime news)

ही घटना शुक्रवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी तीव्र भावना व्यक्त करत हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली. नातेवाइकांसह इतरांनी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेत संशयितांना तत्काळ अटकेची मागणी केली.

मृत यशवंत यांच्या पत्नी आशाबाई बागूल यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे पती यशवंत सुरेश बागूल यांनी उभंड नांद्रे (ता. धुळे) शिवारात पाच वर्षांपूर्वी शेती विकत घेतली होती. त्यासाठी यशवंत बागूल दोन- चार दिवस शेतात मुक्कामी राहात असे.

२१ मेस आशाबाई यशवंत बागूल, त्यांचा मुलगा प्रेम (वय १४), संगमित (वय ६) आणि मुलगी प्राची (वय १२) उभंड नांद्रे शिवारातील शेतात गेले. तेथे बागूल कुटुंबीय आशाबाई यांची मामे सासू सुनीता राजेंद्र मोहिते यांच्या घरी मुक्कामाला थांबले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Murder
Crime News : दारुच्या नशेत मित्राची हत्या! अटकेनंतरही झिंगाट, पोलिसांना म्हणाले 20 ची द्या...

डाळिंबकामी यशवंत बागूल आसपासच्या गावात मजुरांचा शोध घेत होते. गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास ते आणि त्यांच्या मामेभाऊ पंकज राजेंद्र मोहिते दुचाकीने उभंड नांद्रे येथून पिंपरखेड येथे मजूर शोधासाठी निघाले. रात्री साडेआठच्या सुमारास पंकज एकटाच दुचाकीने उभंडला घरी परतला.

त्याने सांगितले, की मी आणि यशवंत बागूल दोघे मजूर शोधून परत उभंडकडे येताना उभंड ते पिंपरखेडा गावादरम्यान पिंपरखेडा बारी येथे रात्री सव्वाआठच्या सुमारास दुचाकीवरून जाणारे दोन अनोळखी व्यक्ती भेटले. ‘अण्णा थांब’, असा आवाज त्यांनी यशवंत यांना दिला.

त्यामुळे दुचाकी थांबवली. त्या दोघांशी यशवंत बाजूला जाऊन बोलत असताना दोघांपैकी एकाने कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढत यशवंत यांच्यावर फायर केला. त्यात बागूल यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. सोबतच्या दुसऱ्या व्यक्तीने धारधार चाकूने गळा, छातीवर उजव्या हाताच्या काखेत वार करून यशवंत बागूल यांना ठार केले.

Murder
Crime News: CM शिंदेच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाची हत्या; चाॅपर, तलावरीने हल्लेखाेरांनी...

या प्रकारामुळे घाबरलेल्या पंकज याने दुचाकीने घटनास्थळावरून पळ काढला. मी संशयितांना पाहिल्यास ओळखून घेईल, असेही पंकज याने आशाबाईला सांगितले. त्यानुसार आशाबाई आणि नातेवाईक तसेच पोलिस उपअधीक्षक राम सोमवंशी, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे पथकासह घटनास्थळी गेले. जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांनी यशवंत यांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात संशयित दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

संशयितांना तत्काळ अटक करा

यशवंत बागूल आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या खुनाची माहिती समजल्यावर आंबेडकरी अनुयायी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एकत्र जमले. ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, प्रशांत बागूल, नगरसेविका वंदना भामरे, अ‍ॅड. संतोष जाधव, शंकर खरात, राज चव्हाण, नागसेन बागूल, संजय बैसाणे, निशांत मोरे,

किरण गायकवाड, चंद्रमणी खैरनार, भय्या पारेराव, योगेश जगताप, राहुल वाघ, किरण ढिवरे आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. संशयितांचा तत्काळ छडा लावून त्यांना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका एम. जी. धिवरे यांनी मांडली. नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने स्थिती निवळली.

Murder
Nashik Crime : सिडकोत गावगुंडांकडुन गाड्यांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.