शिरपूर (जि. धुळे) : नटवाडे (ता. शिरपूर) येथे कुऱ्हाडीने वार करून पतीने पत्नीचा निर्घृण खून केला. ही घटना १८ ऑगस्टला रात्री आठला घडली. तपकीर देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयिताला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, मृत महिलेचा सासरकडील लोकांकडून सातत्याने छळ होत असल्यामुळे त्यांनाही अटक करावी, अशी मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या नातलगांनी नकार दिला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस त्यांची समजूत घालत होते. (Murder of wife by husband for not giving tapkir Dhule crime latest marathi news)
गीताबाई रामलाल पावरा असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती रामलाल व मुलांसोबत नटवाडे येथे राहत होती. १८ ऑगस्टला सायंकाळी रामलाल पावरा याने पत्नीकडे तपकीर मागितली. तिने तपकीर देण्यास नकार दिला.
त्याचा राग आल्याने संशयित रामलालने तिच्या डोक्यात वार केला. रक्तबंबाळ गीताबाईला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. संशयित रामलाल हाजऱ्या पावरा याला पोलिसांनी शिताफीने अटक केली.
मृत गीताबाईचे माहेर प्रधानदेवी (ता. शिरपूर) येथील आहे. तिचे वडील गुलसिंह बाबा पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णालयात गोंधळ
गीताबाईच्या खुनाचे वृत्त कळताच येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन पोचलेल्या तिच्या माहेरच्या स्त्रियांनी आक्रोश केला. तिचे नातलगही संतप्त झाले होते. गीताबाईचा सासरी छळ सुरू होता, त्यात सासरचे इतर लोकही सहभागी होते, असा आरोप करून सर्व संशयितांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी करून मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी त्यांची उशिरापर्यंत समजूत काढत होते. या गोंधळामुळे रुग्णालय परिसरात तणाव पसरला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.