तळोदा : सातपुड्यातील मशरूम उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली असून, अनेक बेरोजगार तरुण- तरुणींच्या रिकाम्या हातांना काम मिळाले आहे. सातपुड्याच्या मातीत बहरलेल्या मशरूम आणि काळ्या तांदळाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळणार असून, हे दोन्ही उत्पादन अमेरिकेत जाणार असल्याची माहिती मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी दिली. (Mushrooms and black rice from Satpuda will be exported to the US world market taloda nandubar news)
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या देवमोगरा पुनर्वसन येथे मशरूम युनिटद्वारे राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, तरुण तसेच तरुणींच्या सहभागातून मशरूम शेती विकसित केली जात आहे. मशरूम शेतीच्या माध्यमातून परिसरातील अनेक बेरोजगार महिला व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे.
दरम्यान, या मशरूम युनिटला सामाजिक कार्यकर्त्या व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हिरा विलास पाडवी यांनी भेट देऊन मशरुम शेतीची पाहणी केली. या वेळी मशरूम शेतीच्या महिला मार्गदर्शक लीला वसावे व कीर्ताबाई वसावे यांनी हिरा पाडवी यांना मशरूम शेतीची माहिती दिली. तसेच सातपुड्यातील महिलांना घरच्या घरी आपले दैनंदिन काम सांभाळून करता येण्यासारखा एक चांगला व जास्तीत जास्त रोजगार, तसेच फायदेशीर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले.
अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनी अशा ठिकाणी भेट देऊन या व्यवसायला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत हिरा पाडवी यांनी व्यक्त केले. सोबतच येथील मशरूम व काळा तांदूळ आपण अमेरिकेत स्थायिक असलेल्या आपल्या मुलीला पाठविणार असल्याचे सांगितले. या वेळी मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सातपुड्यात वाढत असलेल्या मशरूम व्यवसायाची माहिती दिली. तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना स्वःविकासासाठी सहाय्यता उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. पुनर्वसन येथील महिला घेत असलेल्या पुढाकाराचे हिरा पाडवी यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.