Water Crisis : शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव निम्म्यावर व डेडरगाव तलावातील पाणीसाठा निम्मा कमी झाला आहे. पावसाळ्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा असला तरी निसर्गाच्या लहरीपणा लक्षात घेता शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे. (Nakane lake half empty Dedargaon lake also half dhule news)
धुळे शहराच्या ६० टक्के भागाला तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. या योजनेवर पाणीसाठ्याची कमतरता नसते. यंदाही तशी स्थिती आहे. दरम्यान, ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलाव, डेडरगाव तलावातील पाणीही कमी झाले आहे.
नकाणे तलावातून रोज सुमारे एक एमसीएफटी पाणी घेतले जाते, तर डेडरगाव तलावातून ०.२५ एमसीएफटी पाणी घेतले जाते. नकाणे तलावाची पाणी साठवणक्षमता ३६० एमसीएफटी आहे. सद्यःस्थितीत हा पाणीसाठा ११७ एमसीएफटी आहे.
अर्थात एकूण क्षमतेच्या निम्म्यावर पाणीसाठा कमी झाला आहे. दुसरीकडे डेडरगाव तलावाची क्षमता १२० एमसीएफटी आहे. सद्यःस्थितीत तलावात ५९ एमसीएफटी पाणी शिल्लक आहे. या दोन्ही तलावातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेसा असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे असले तरी निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता पावसाने मोठी दांडी मारली तर समस्या उभी राहू शकते. त्यामुळे शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे. अर्थात शहरवासीयांना सध्या चार-पाच ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.
त्यामुळे नागरिकांनी आणखी किती काटकसरीने पाणी वापरावे हाहा प्रश्नच आहे. जे नागरिक पाणीपुरवठ्यानंतर पाण्याची वारेमाप उधळपट्टी करतात, अर्थात वाहने धुणे, अंगणात पाणी मारणे, नळ उघडाच सोडणे आदी प्रकार मात्र थांबण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.