Dhule News : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नकाणे तलाव कोरडाठाक

शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव धुळे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरडाठाक पडला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.
Former MLA  Anil Gote inspecting Express Canal
Former MLA Anil Gote inspecting Express Canalesakal
Updated on

Dhule News : शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव धुळे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरडाठाक पडला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.

माजी आमदार गोटे यांनी मंगळवारी (ता. १६) एक्स्प्रेस कॅनॉल व नकाणे तलावाची पाहणी केली. या प्रसंगी ते म्हणाले, की पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चूनदेखील धुळेकर नागरिकांना आजही दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. (Nakane Lake is dry due to neglect of Municipal Corporation dhule news)

केवळ एक कोटी २५ लाख रुपये खर्चात त्या वेळी एक्स्प्रेस कॅनॉल पूर्ण केला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नकाणे तलाव ओसंडून वाहत होता. एक्स्प्रेस कॅनॉलच्या दुरवस्थेला महापालिका जबाबदार आहे.

आज कॅनॉलमध्ये झाडेझुडपे व काही ठिकाणी अक्षरशः वृक्ष वाढले आहेत. एक्स्प्रेस कॅनॉलचा वापर थांबल्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर नकाणे तलाव कोरडा पडला आहे.

२४ वर्षांपूर्वी अक्कलपाडा धरण नव्हते, पाण्याचा साठा उपलब्ध नव्हता, त्यामुळे पाणी आणायचे कुठून, हा प्रश्न होता.

त्या काळात आपण नकाणे तलावात ओसंडून वाहण्याइतके पाणी साठविले व धुळेकर जनतेची पाण्यावाचून सुरू असलेली वणवण थांबविली.

Former MLA  Anil Gote inspecting Express Canal
NMC News : महापालिकेच्या 400 सुरक्षारक्षकांना मुदतवाढ

आता जामखेडी, मालणगाव, पांझरा व अक्कलपाडा धरणांत पाण्याचा साठा असूनही महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धुळेकर नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत.

महाराष्ट्रात कुठेही नसेल एवढा पाण्याचा साठा धुळे शहरासाठी उपलब्ध असताना नागरिकांना कोरडे ठेवले जात आहे, असा आरोप श्री. गोटे यांनी केला.

महापालिकेने गेल्या पाच वर्षांत पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले. मात्र, दुर्दैवाने आजही सामान्य धुळेकरांना नळाला आठ-आठ, दहा-दहा दिवस पाणी येत नाही, असेही श्री. गोटे म्हणाले.

Former MLA  Anil Gote inspecting Express Canal
Dhule News : बोरी नदी पट्ट्यात 30 कोटींतून रस्त्यांची कामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.